Lok Sabha Election: पॉलिटिकल स्ट्रेटजिस्ट प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राजकारणातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, मागील १० वर्षापासून ते एकच काम करत आहेत. अनेक अपयशानंतरही ते मागे हटत नाहीत व दुसऱ्यालाही पुढे येऊ देत नाहीत. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखातीत राहुल गांधींना काही सल्ले दिलेत.
प्रशांत किशोर यांनी म्हटले की, राहुल गांधी हिंदी पट्ट्यात निवडणूक जिंकू शकत नाहीत. तर वायनाडमधून जिंकल्याचा काहीच फायदा नाही. काँग्रेसची लढाई मुख्यरित्या उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या हिंदी भाषिक राज्यात आहे. मात्र त्यांचे नेते मणिपूर आणि मेघालयाचे दौरे करतात. केवळ केरळमध्ये जिंकून देशात विजय मिळवता येत नाही. राहुल गांधी यांनी अमेठी सोडणे देशातील जनतेला चुकीचा संदेश दिल्यासारखे आहे. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचे उदाहरण देत म्हटले की, पीएम मोदी २०२४ मध्ये गुजरातसोबतच उत्तर प्रदेशमधूनही निवडणूक लढले होते.
प्रशांत किशोर यांनी म्हटले की, राहुल गांधी मागील १० वर्षापासून एकच काम करत आहे. त्यात त्यांना यश मिळत नसेल तर ब्रेक घेण्यात काहीच वाईट नाही. तुम्ही दुसरे कोणाला तरी पाच वर्षे काम करू द्यावे. सोनिया गांधी यांनीही हे केले आहे. जेव्हा माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची हत्या झाली होती तेव्हा सोनिया गांधींनी १९९१ मध्ये राजकारणापासून अंतर राखले होते. त्यांनी काँग्रेसची सूत्रे पीव्ही नरसिम्हा राव यांना दिली व त्यांनी पूर्ण निकाल बदलले.
प्रशांत किशोर यांनी म्हटले की, २०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की, पक्षाची जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी सोपवली जाईल. मात्र असे झाले नाही.
काँग्रेस पक्ष व काँग्रेसचे समर्थक कोणाही एका व्यक्तीपेक्षा मोठे आहेत. त्यामुळे राहुल यांनी अनेक अपयशानंतरही काँग्रेसचे नेतृत्व करावे हा, हट्ट सोडावा.
प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना सल्ला दिला कि, निवडणुकीतील पराभवासाठी निवडणूक आयोग व माध्यमांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. राहुल गांधी निवडणूक हरल्यानंतर न्यायपालिका आणि मीडियावर आरोप करतात. हे आंशिक रूपाने सत्य असू शकते, मात्र संपूर्ण सत्य नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा केंद्रीय संस्थांवर इतका प्रभाव नव्हता. तरीही काँग्रेस २०६ जागांवरून ४४ जागांवर घसरली.