मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : प्रशांत किशोर यांची भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती? काय आहे व्हायरल पत्राबाबत सत्य

Fact Check : प्रशांत किशोर यांची भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती? काय आहे व्हायरल पत्राबाबत सत्य

Boom HT Marathi
May 24, 2024 04:24 PM IST

Prashant Kishor in Bjp : बूमशी बोलताना निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयाने हे व्हायरल लेटर बनावट असल्याचे म्हटले. तसेच जनसुराज संघटनेकडूनही एक्सवर या वृत्ताचे खंडन केले आहे.

प्रशांत किशोर यांची भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती?
प्रशांत किशोर यांची भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती?

सोशल मीडियावर एक व्हायरल होत असलेल्या पत्रात दावा केला जात आहे की, निवडणूक रणनितीकार आणि जनसुराज संघटनेचे प्रमुख प्रशांत किशोर यांना भारतीय जनता पार्टी (बीजेपी) चा राष्ट्रीय प्रवक्ता नियुक्त करण्यात आले आहे. बूमला फॅक्ट चेकमध्ये आढळले की, व्हायरल लेटर फेक आहे. बूमशी संवाद साधताना प्रशांत किशोरच्या ऑफिसने हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल लेटरमध्ये लिहिले आहे की,'बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी प्रशांत किशोर यांना पार्टीचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्त केले आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.'(BJP National President Shri Jagat Prakash Nadda has appointed Shri Prashant Kishore as the National Chief Spokesperson of BJP. This appointment comes into immediate effect.)

फेसबुकवरएका यूजरने लेटर शेअर करताना लिहिले की,'जनसुराज आंदोलनाचेपाखंडी प्रशांत किशोरयांचे अभिनंदन करा...बिहारला बदलणार होता, स्वत:च बदलला...जेथून सुरुवात केली होती, तेथेच पोहोचला आहे...

फेसबुकवर व्हायरल झालेली पोस्ट
फेसबुकवर व्हायरल झालेली पोस्ट

फॅक्ट चेक

बूमने केलेल्या पडताळणीत आढळले की, व्हायरल होत असलेले हे लेटर फेक आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. व्हायरल लेटरच्या पडताळणीसाठी संबंधित कीवर्ड्सने गूगलवर सर्च केल्यानंतर अशी कोणतीही न्यूज रिपोर्ट आढळले नाही.

त्याचबरोबरभाजपआणिप्रशांत किशोरयांच्या सोशल मीडिया हँडलवरही आम्हाला असे कोणतेही लेटर मिळाले नाही.

दरम्यान प्रशांत किशोर यांच्या जनसुराज संघटनेच्या एक्स हँडलवर एक पोस्ट मिळाली. या पोस्टमध्ये व्हायरल लेटरचे खंडन करण्याबरोबरच काँग्रेसचे प्रचार प्रभारी जयराम रमेश यांच्यावर हे लेटर शेअर केल्याचा आरोप लावला आहे.

जनसुराजने काँग्रेस,राहुल गांधी आणि जयराम रमेश यांच्यासोबत दिल्ली पोलिसांना टॅग करत लिहिले की,'विरोधाभास पाहा,काँग्रेस,राहुल गांधी,आप सर्वजण फेक न्यूजवर बोलतात तसेच यामुळे पीडित असल्याचा दावा करतात. आता तुम्ही स्वत:पाहाकसे काँग्रेस नेते जयराम रमेश,एक वरिष्ठ नेते वैयक्तिकरित्या एक फेक लेटर शेअर करत आहेत. याचबरोबर पोस्टमध्ये एक व्हॉट्सऐप मेसेजचा स्क्रीनशॉट टाकला आहे. ते पाहून प्रतीत होते की, जयराम रमेश यांच्याकडून हे लेटर पोस्ट करण्यात आले होते.

पोस्ट पाहा

दरम्यान बूम या स्क्रीनशॉटची स्वतंत्ररित्या पुष्टि करत नाही.

बूमशी संवाद साधताना प्रशांत किशोर यांच्या कार्यालयातील हर्षवर्धन सिंह यांनी सांगितले की, प्रशांत किशोर यांचा भारतीय जनता पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांचा संपूर्ण फोकस जन सुराजच्या मिशनला मजबूत करण्यावर आहे. हर्षवर्धन यांनी सांगितले की, जनसुराजने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांनी भाजप ज्वाईन केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यात म्हटले आहे की, अशा प्रकारची खोटी माहिती काँग्रेसचे जयराम रमेश यांच्याकडून पसरवली जात आहे. 

व्हायरल लेटरमध्ये  बीजेपीचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांचे हस्ताक्षर आहेत. याबाबत आम्ही अरुण सिंह यांच्या ऑफिसमध्ये संपर्क केल्यानंतर हे व्हायरल लेटर बनावट असल्याची पुष्टि करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी या लोकसभा निवडणुकीत भाजपला जवळपास ३०० जागा मिळण्याची शक्यता   वर्तवली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. यावर प्रशांत किशोर यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले की, 'पाणी पिणे चांगले आहे, कारण हे मेंदू व शरीर दोन्हीला हायड्रेटेड ठेवते. जे लोक या निवडणूक निकालाच्या अंदाजाने त्रस्त आहेत, त्यांनी ४ जून रोजी भरपूर पाणी आपल्या जवळ ठेवले पाहिजे. २ मे २०२१ आणि बंगालला आठवणीत ठेवा'

(डिस्क्लेमर: हे मूळ वृत्त BOOM ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

टी-२० वर्ल्डकप २०२४