मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bihar Politics : 'तर राजकारणातून संन्यास घेईन...', बिहारमधील सत्तांतरानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

Bihar Politics : 'तर राजकारणातून संन्यास घेईन...', बिहारमधील सत्तांतरानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 29, 2024 08:03 AM IST

Bihar Politics : नितीश कुमार धूर्त राजकारणी आहेत. त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे. बिहारची जनता याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका प्रशात किशोर यांनी केली आहे.

Prashant Kishor
Prashant Kishor

Prashant Kishor On Nitish Kumar : बिहारमधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, आजच्या घटनेने स्पष्ट केले की, बिहारमध्ये केवळ नितीश कुमारच नाही तर सर्व पक्ष'पलटूराम' आहेत. त्यांनी दावा केला की, २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत ही आघाडी टिकणार नाही. या घटनेमुळे भाजपचेही मोठे नुकसान होईल.

प्रशांत किशोर म्हणाले की, नितीश कुमार धूर्त राजकारणी आहेत. त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे. बिहारची जनता याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. नितीश कुमार कोणत्याही आघाडीकडून लढले तरी पुढच्या निवडणुकीत त्यांच्या २० ही जागा निवडून येणार नाहीत. जर यापेक्षा अधिक आल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन.

प्रशांत किशोर यांनी यापूर्वी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधताना म्हटले होते की, नीतीश कुमार जर इंडिया आघाडीकडून लढले तर लोकसभा निवडणुकीत त्यांना पाच जागाही मिळणार नाहीत. पाचहून अधिक जागा मिळाल्यास ते सार्वजनिकरित्या माफी मागतील.

गेल्या तीन दिवसांपासून बिहारमधील सत्तासंघर्षावर आजअखेर पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार यांनी ९ व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित शपथविधी सोहळा पार पडला.

 

राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की,आम्ही राजद सोबत नवी आघाडी स्थापन केली होती. मात्र, त्यांची स्थिती चांगली दिसत नाही. त्यामुळं आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं नितीश कुमार म्हणाले. आरजेडीसोबत काम करताना खूप त्रास होता होता. मी भरपूर काम करण्याचा प्रयत्न करत होतो. कुठलंही काम केलं की त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न व्हायचा. सरकारी नोकर भरती असो, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा विषय असो किंवा जातीनिहाय जनगणना असो. प्रत्येक निर्णयाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला जायचा. त्यामुळं मी अस्वस्थ होतो. बरेच दिवस सहन केलं. काही बोलत नव्हतो. शांत होतो,’अशा शब्दांत नितीश यांनी आपली बाजू मांडली.

WhatsApp channel