राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे व जी कायम स्वरुपी स्थापित केली जाणार आहे, ती मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. एका ट्रकमध्ये ठेऊन पिवळ्या रंगाच्या कव्हरने झाकून ही मूर्ती अयोध्येत दाखल झाली आहे. देशभर भ्रमण करून प्रभू रामाची मूर्ती अयोध्येत दाखल झाल्याने अवघा देश राममय झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दुसरीकडे मंदिराच्या गर्भगृहात पूजा विधी सुरू झाल्या आहेत.
रामलल्लाची अचल मूर्ती बुधवारी सायंकाळी विवेक सृष्टि परिसरात मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत राम जन्मभूमी परिसरात पोहोचली. ही मूर्ती बंद ट्रकमध्ये विराजमान करून आणण्यात आली.
याच्या सुरक्षेसाठी पीएसीचे २०० जवान, एटीएसची टीम आणि उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी तैनात होते. ही अचल मूर्ती सोन्याच्या सिंहासनावर उद्या (गुरुवारी) विराजमान केले जाणार आहे. यासाठी मंदिराच्या गर्भगृहात सिंहासन बनून तयार झाले आहे.
संबंधित बातम्या