प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Mar 28, 2022 01:17 PM IST

विश्वजीत राणे की प्रमोद सावंत? गोव्याची सत्ता एकहाती भाजपनं जिंकल्यावर हाच प्रश्न तमाम गोवेकरांच्या मनात निर्माण झाला होता. आज मात्र प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर, या साऱ्या चर्चांना विराम मिळाला.

<p>गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत</p>
<p>गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत</p> (HT_PRINT)

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जितका ड्रामा झाला नव्हता, तितका ड्रामा, गोव्यात भाजपची सत्ता आल्यानंतर “कौन बनेगा मुख्यमंत्री?” या चर्चेनं झाला होता. एकीकडे विश्वजीत राणे तर दुसरीकडे प्रमोद सावंत यांच्यात चुरस पाहायला मिळत होती. दुसऱ्यांदा सत्तेचा सारीपाट राखण्यात यशस्वी झालेली भाजप, गोव्यात मुख्यमंत्री म्हणून नवा चेहरा आणते? की गेली पाच वर्ष ज्यांनी गोव्याचा कारभार सांभाळला, त्या जुन्या नेतृत्वावर विश्वास दाखवते, याची चर्चा गोव्यात गेले काही दिवस रंगत होती.

अखेर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जुन्याच नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि सलग दुसऱ्यांदा, प्रमोद सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. गोव्यात 40 पैकी 20 जागा भाजपने एकहाती जिंकल्या आणि त्यातच त्यांना 3 अपक्ष आमदारांनीही साथ दिली.

कोकणी भाषेत प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झालेल्या या शपधविधी सोहळ्याला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी शपथ घेतल्यानंतर, इतर 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यात विश्वजीत राणे, मौविन गोडिण्डो, रवी नायक, निलेश कॅबराल, सुभाष सिरोडकर, रोहन खुंटे, गोविंद गौडे, अतानासियो मोनसेराते यांचा समावेश आहे.

काय सांगतं गोव्याचं पक्षीय बलाबल?

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळेल, असा अंदाज, आम आदमी पक्ष, ममता दिदींचा तृणमूल यांनी खोटा ठरवला.गोव्याचं पक्षीय बलाबल काय आहे? पाहुया

 

पक्ष           जिंकलेल्या जागा

भाजप             20

काँग्रेस             11

आप                02

म.गो.प.           03

अपक्ष              03

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर