मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PMUY: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; एलपीजी सिलिंडरवर आणखी वर्षभर सबसिडी मिळण्याची शक्यता

PMUY: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; एलपीजी सिलिंडरवर आणखी वर्षभर सबसिडी मिळण्याची शक्यता

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 07, 2024 04:34 PM IST

Pradhan Mantri Ujjwala Yojana : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार एलपीजी सबसिडी मार्च २०२५ पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

LPG Cylinder
LPG Cylinder (Utpal Sarkar)

PM Ujjwala Yojana: लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. सरकार या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलिंडरवरील अनुदान ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवू शकते. या निर्णयाचा देशातील 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योजनेतील लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२५ पर्यंत सबसिडी मिळण्याची शक्यता आहे. अनुदान एक वर्षाने वाढवल्यास सरकारला अतिरिक्त १२ हजार कोटी रुपये मोजावे लागतील. सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये सबसिडी देते. या सबसिडीमुळे देशाची राजधानी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ६०३ रुपये झाली. दिल्लीतील सामान्य ग्राहकांसाठी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना २०० रुपये अनुदान मिळत होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये अनुदानाची रक्कम १०० रुपयांनी वाढवून ३०० रुपये करण्यात आली. भारत सरकार सध्या हे अनुदान लाभार्थ्यांना एका वर्षात १२ रिफिलवर देते.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शन दिले. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत या योजनेअंतर्गत ९.६७ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांत ७५ लाख एलपीजी कनेक्शन जारी करण्याच्या योजनेच्या विस्तारास मान्यता दिली. ७५ लाख अतिरिक्त उज्ज्वला कनेक्शनच्या तरतुदीमुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या १०.३५ कोटी होईल.

IPL_Entry_Point

विभाग