Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

May 09, 2024 09:11 PM IST

Hindu Population : रिपोर्टनुसारभारतात १९५० ते २०१५ पर्यंत६५ वर्षाच्या काळात बहुसंख्याक हिंदुंच्या लोकसंख्येत मोठी घट झाली आहे. या काळात हिंदूच्या लोकसंख्यात ६ टक्के घट झाली आहे. तर मुस्लिम लोकसंख्या वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी
भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी

भारतात हिंदु भलेही बहुसंख्याक असू देत, मात्र त्यांची संख्या गतीन कमी होत आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मुस्लिमांची जनसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार भारतात १९५० ते २०१५ पर्यंत ६५ वर्षाच्या काळात  बहुसंख्याक हिंदुंच्या लोकसंख्येत मोठी घट झाली आहे. या काळात हिंदूच्या लोकसंख्यात ६ टक्के घट झाली आहे.

एनएडीआरएकडून कम्प्यूटरीकृत राष्ट्रीय ओळख पत्र प्राप्त करणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या आधारावर डेटा गोळा करणाऱ्या एका रिपोर्टमध्ये १७ वेगवेगळ्या धर्मातील लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या रिपोर्टमध्ये कोणताही धर्म न मानणाऱ्यांची संख्या १,४०० आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नोंदणीकृत हिंदुंची संख्या २२,१०,५६६ आहे. त्यानंतर ख्रिश्चन १८,७३,३४८, अहमदी १,८८,३४०, शीख ७४,१३०, आणि ३,९१७ पारशी आहेत. रिपोर्टमध्ये ११ असे अल्पसंख्याक समुदाय आहेत त्यांची संख्या २,००० हून कमी आहे. 

पीएमच्या आर्थिक सल्लागार परिषद (ईएसी-पीएम) च्या एका रिपोर्टमध्ये भारतातील बहुसंख्यांक व अल्पसंख्यांक समाजाची टक्केवारी दिली आहे. भारतात १९५० ते २०१५ दरम्यान हिंदूंच्या लोकसंख्येत घट झाली आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक मुस्लिमो, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख लोकसंख्येत वाढ झाली आहे. जैन आणि पारशी लोकसंख्येतही घट झाली आहे. या स्टडीनुसार मुस्लिमांची संख्या ५ टक्के वाढली आहे. त्याचबरोबर ख्रिश्चन लोकसंख्या ५.३८, शीख लोकसंख्या ६.५८ टक्क्यांनी वाढली आहे. इतकेच नव्हे तर बौद्धांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या दरम्यान  मुस्लिम लोकश्या ९.८४% ने वाढून १४.०९ % झाली आहे. ख्रिश्चन लोकसंख्या २.२४ टक्क्यांनी वाढू २.३६ टक्के झाली आहे. देशात शीख समुहाची लोकसंख्या १२४ टक्के वाढून १.८५ टक्के  झाली आहे. तसेच भारताचे शेजारी पाकिस्तान, बांग्लादेशमध्येही मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे. बांग्लादेशात सर्वाधिक १८. ५ टक्के वृद्धी आहे. त्यानंतर पाकिस्तान ३.७५ टक्के तर अफगानिस्तानात ०.२९ टक्के वृद्धी दर राहिला.

पाकिस्तानात जैन धर्माचे केवळ सहा लोक -

रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये दोन हजाराहून कमी संख्येने असलेल्या अल्पसंख्यांकामध्ये बौद्ध १,७८७, चीनी १,१५१, शिंटो धर्माचे अनुयायी ६२८, यहूदी ६२८, अफ्रीकी धर्माचे अनुयायी १,४१८, केलाशा धर्माचे अनुयायी १,५२२ आणि जैन धर्माचे केवळ सहा अनुयायी आहेत. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यकांची मोठी लोकसंख्या सिंध प्रांतात आहे. 

म्यानमार आणि नेपाळमध्येही हिंदू घटले - 
म्यानमारमध्ये या काळात बहुसंख्याक बौद्ध समुदायाची लोकसंख्येच्या प्रमाणात १० टक्के कमी आली आहे. तसेच भारतात हिंदुंच्या लोकसंख्यात ६.८ टक्के घट झाली आहे. नेपाळमध्ये बहुसंख्यक हिंदुंची लोकसंख्या ३.६ टक्क्यांनी घट झाली.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर