pope on United nation election : ख्रिश्चन धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोघांना वाईट म्हटलं आहे. स्थलांतरितविरोधी धोरणे आणि कमला हॅरिसचा गर्भपात अधिकारांना पाठिंबा देत शुक्रवारी सांगितले की दोन्ही उमेदवार जीवनाविरोधी आहेत, दोघेही सैतान आहेत. आता अमेरिकन जनतेला ठरवायचे आहे. त्यांना जो उमेदवार कमी वाईट वाटेल, त्यांनी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार त्याला मत देऊन निवडावे. पोप म्हणाले, की जे जीवनाच्या विरोधात आहेत ते खरे ख्रिश्चन असूच शकत नाहीत.
१२ दिवसांच्या आशिया दौऱ्यानंतर रोमला परतलेल्या पोप यांना प्रसारमाध्यमांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी वरील टीका केली. पोप म्हणाले की, दोघेही जीवनाच्या विरोधात आहेत. एक स्थलांतरितांना विरोध करतो तर दुसरी या जगात येण्याआधीच मुलांना जीव घेण्याच्या विचारात आहे. हे दोन्ही उमेदवार जीवनविरोधी आहेत. मी अमेरिकेचा रहिवासी नाही आणि मी तेथे मतदान करणार नाही, असे पोलस्पोप म्हणाले. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की स्थलांतरितांना देशात येऊ न देणे, त्यांना काम करू न देणे, त्यांचे स्वागत न करणे किंवा गर्भपाताचे समर्थन करणे हे सर्व पाप आहे आणि जो कोणी असे करतो किंवा त्याचे समर्थन करतो ते देखील पापी आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या स्थलांतरितविरोधी धोरणांसाठी ओळखले जातात. त्यांनी अलीकडेच बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे आणि त्यांना निर्वासित करण्याचे अमेरिकन जनतेला आश्वासन दिले. दुसऱ्या उमेदवार कमला हॅरिस यांनी महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार देणारा कायदा आणण्याच्या बाजूने आहेत. हॅरिस या कायद्याचा समर्थक मानल्या जातात. त्यांनी हा कायदा पुन्हा बहाल करण्याचं म्हटलं आहे.
पोप म्हणाले की दोन वाईटांमध्ये कमी वाईट व्यक्ति निवडली पाहिजे. या दोघांपैकी कोण कमी वाईट आहे, कमला की ट्रम्प ? या बाबत मला माहीत नाही. मी म्हणतोय की अमेरिकन लोकांनी त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या आधारे कुण्या एका कमी वाईट व्यक्तीला निवडावे लागेल.
अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. त्याची प्रक्रिया सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस या उमेदवार आहेत. सध्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे पहिले उमेदवार होते. पण, नंतर त्यांनी पक्षाच्या दबावामुळे आणि आरोग्याच्या कारणांमुळे त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात थेट लढत होणार आहे.