gujarat drugs news today : गुजरातच्या मुंद्रा बंदरावर हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या किनारी भागात विदेशी संशयित बोट आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिचा पाठलाग करत त्यातीच पाच विदेशी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडीन ४२५ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याशिवाय मुंद्रा बंदरावरील कारवाईनंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या कच्छमध्ये तटरक्षक दलाला एका विदेशी संशयित बोटीबद्दल माहिती मिळाली होती.त्यानंतर तटरक्षक दलानं दोन जहाजांच्या मदतीनं संशयित बोटीचा पाठलाग करत पाच विदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६१ किलोंचं हेरॉईन जप्त करण्यात आलं असून ४२५ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. त्यानंतर आता भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठा थरार...
तटरक्षक दलाच्या जवानांना गुजरातच्या ओखा किनाऱ्यापासून ३४० किलोमीटर दूर संशयास्पद बोट आढळून आली. त्यानंतर जवानांनी बोटीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. आयसीजीच्या जहाजांनी बोटीतील आरोपींना थांबण्यास सांगितलं. परंतु आरोपींनी बोटीचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जवानांनी बोटीला घेरून आरोपींना ताब्यात घेतलं. त्यातील सर्व पाच आरोपी हे इराणचे नागरिक असून ते भारतात ड्रग्जची तस्करी करत असल्याचं उघड झालं आहे.
संबंधित बातम्या