मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बेशुद्ध होऊन कोसळला हेड कांस्टेबल, झाला मृत्यू..; रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस बनवत राहिले व्हिडिओ

बेशुद्ध होऊन कोसळला हेड कांस्टेबल, झाला मृत्यू..; रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस बनवत राहिले व्हिडिओ

Jun 19, 2024 06:11 PM IST

Heat Wave :पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराचा उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाला. पोलीस हवालदार बेशुद्ध होऊन पडले तेव्हा त्यांच्यासोबत असलेले पोलीस निरीक्षक हवालदाराला रुग्णालयात नेण्यापूर्वी व्हिडिओग्राफी करू लागले.

उष्माघातामुळे पोलिस हवालदाराचा मृत्यू
उष्माघातामुळे पोलिस हवालदाराचा मृत्यू

उत्तरप्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरूच आहे. हीट वेव मुळे अनेक लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूरमधून समोर आली आहे. येथे यूपी पोलीसमधील एक हेड काँस्टेबल उष्माघाताने चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षकही होते. त्यांनी हेड काँस्टेबलला रुग्णालयात पोहोचवण्याआधी त्यांची वीडियोग्राफी करायला सुरूवात केली. हवालदाराला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिस याचा व्हिडिओ बनवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. हवालदाराला आधी रुग्णालयात नेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी असे केले नाही. ते पोलीस हवालदाराचा व्हिडिओ बनवत राहिले. पोलिसांचा बेजबाबदारपणा यामुळे समोर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यावर चौकशीचे आदेश दिले आहेत.

मृत हवालदार कानपूरच्या एका पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराचा उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाला. पोलीस हवालदार बेशुद्ध होऊन पडले तेव्हा पोलीस ठाण्याचे निरीक्षकही त्यांच्यासोबत होते. त्यांनी पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यापूर्वी व्हिडिओग्राफी सुरू केली. हा सगळा प्रकार आता सोशल मीडियातून समोर आल्यानंतर रोष व्यक्त केला जात आहे.

झांसीमध्ये राहणारे पोलीस हवालदार बृज किशोर सिंह मंगळवारी सकाळी तीन दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या घरी झांसीला जात होते. पोलिस स्टेशनच्या बाहेर येताच ते चक्कर येऊन कोसळले. त्यानंतर तेथे तैनात पोलीस अधिकारी त्यांच्याजवळ आला व बेशुद्ध पडलेल्या हवालदाराची व्हिडिओग्राफी करू लागले. काही वेळानंतर ब्रजकिशोर यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हेड काँस्टेबलला तत्काळ रुग्णालयात का नेले नाही, त्यांची व्हिडियोग्राफी का केली? असा सवाल उपस्थित होत आहे.

कानपूर पोलीस अधीक्षक मोहसिन खान यांनी सांगितले की, उपचारादरम्यान हवालदार ब्रज किशोर यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी व्हिडिओ का बनवला त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

WhatsApp channel
विभाग