मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi And Yogi : तीन दिवसांत PM मोदी आणि CM योगींना बॉम्बनं उडवू; व्हॉट्सअ‍ॅपवर धमकी देणाऱ्याला अटक

Modi And Yogi : तीन दिवसांत PM मोदी आणि CM योगींना बॉम्बनं उडवू; व्हॉट्सअ‍ॅपवर धमकी देणाऱ्याला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 14, 2022 08:06 PM IST

CM Yogi Adityanath : उद्या भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार असतानाच आता पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे.

PM Modi And CM Yogi
PM Modi And CM Yogi (HT)

PM Modi And CM Yogi : उद्या भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना येत्या तीन दिवसांत बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. यूपीच्या मुख्यालयात कर्मचारी असलेल्या शाहीद खान या तरुणाला त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोदी आणि योगींची हत्या करणार असल्याची धमकी मिळाल्यानंतर लखनौच्या सायबर सेलनं आरोपी सरफराजला राजस्थानातल्या भरतपूरमधून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहिद खान या तरुणाला येत्या तीन दिवसांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर त्यांनी या धमकीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करत ज्या नंबरवरून धमकीचा मेसेज आला आहे, त्याची माहिती शोधून पोलिसांचे विविध पथकं तयार करून आरोपीला अटक केली आहे.

PM Modi And CM Yogi : उद्या भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना येत्या तीन दिवसांत बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. यूपीच्या मुख्यालयात कर्मचारी असलेल्या शाहीद खान या तरुणाला त्याच्या व्हॉट्सअॅपवर मोदी आणि योगींची हत्या करणार असल्याची धमकी मिळाल्यानंतर लखनौच्या सायबर सेलनं आरोपी सरफराजला राजस्थानातल्या भरतपूरमधून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहिद खान या तरुणाला येत्या तीन दिवसांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर त्यांनी या धमकीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करत ज्या नंबरवरून धमकीचा मेसेज आला आहे, त्याची माहिती शोधून पोलिसांचे विविध पथकं तयार करून आरोपीला अटक केली आहे.

तक्रारदार शाहीद यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सरफराज यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना येत्या तीन दिवसांत उडवून देण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला राजस्थानातून बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शाहीद यांनी योगी आणि मोदींना मारण्याची धमकीचा मेसेज दोन ऑगस्टला मिळाला होता. ११२ या यूपीच्या मुख्यालयाच्या व्हॉट्सअॅप नंबरवरवर ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यावर कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या