AI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची निर्घृणपणे करण्यात आली होती हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  AI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची निर्घृणपणे करण्यात आली होती हत्या

AI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची निर्घृणपणे करण्यात आली होती हत्या

Jan 07, 2025 11:49 AM IST

AI Solve Murder Case : अविवाहित महिला व तिच्या दोन जुळ्या मुलांची हत्या १९ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या हत्येप्रकारणी लष्कराच्या दोन संशयित जवानांना अटक करण्यात आली आहे. या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी एआयची मदत घेतली. यामुळे या खुनाला वाचा फुटली.

AI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची निर्घृणपणे करण्यात आली होती हत्या
AI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची निर्घृणपणे करण्यात आली होती हत्या (iStock photo)

AI Solve Murder Case : अविवाहित आई आणि तिच्या जुळ्या मुलांच्या हत्या  प्रकरणात लष्कराकच्या  दोन जवानांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड १९ वर्षांपूर्वी घडलं असून एआयमुळे या खुनाला वाचा फुटली आहे. पोलिसांनी एआयची मदत घेत या प्रकरणाचा छडा लावला. ही घटना केरळमधील कोल्लम येथील आहे. 

१० फेब्रुवारी २००६ रोजी संथाम्मा या पंचायत कार्यालयातून घरी परतल्या तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला  त्यांची मुलगी आणि तिचे १७ दिवसांचे जुळे बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तिघांचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा अनेक आव्हाने होती. ही हत्या कोणी केली आणि खुनाचे कारण काय असावे ?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक होते. पोलिसांना हे सोधण्यात यश न आल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्लममधील अलमोन येथील मृत महिला रंजिनी आणि लष्करात तैनात असलेल्या डिव्हिल कुमारशी  प्रेमसंबंध होते. दरम्यान, रंजिनी गरोदर राहिली. ती गर्भपात करायला तयार नव्हती. या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाले होते.  यानंतर दिवी कुमार पठाणकोटला गेला. जानेवारी २००६ मध्ये रंजिनीने तिरुअनंतपुरमयेथील रुग्णालयात जुळ्या मुलांना जन्म दिला. दुसरीकडे रंजिनीसोबत संबंध असलेल्या डिव्हिलला पठाणकोट येथील लष्करी छावणीतून आणण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले होते. आयोगाने त्यांची डीएनए चाचणी करण्याचे आदेशही दिले होते.

रंजिनीच्या प्रसूतीपूर्वी तिचे अनिल नावाच्या एका व्यक्तीशी संबंध असल्याचं बोललं जात होतं. या व्यक्तिने नाव बदलून रंजिनीशी मैत्री केली होती. अनिलचं खरं नाव राजेश होत. व तो डिव्हिलसह  सैन्यात नोकरीला होत.  पोलिस तपासात डिव्हिल आणि राजेश यांनी त्या वर्षी जानेवारीमहिन्यात एकत्र रजा घेतल्याचं समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना संथाम्मा म्हणाल्या, 'राजेशने स्वत:चे नाव  अनिल कुमार अशी सांगून आमच्याशी जवळीक निर्माण केली. त्याने  रंजिनीच्या सिझेरियन डिलिव्हरीसाठी रक्ताची गरज आहे का? अशी विचारणा  केली. मात्र, आम्हाला तशी गरज नव्हती. मात्र, असे असतांना तो  हॉस्पिटलमध्ये सारखा येत होता. त्याने  सर्व काही प्लॅन एलए होते. या ठिकाणी त्याने  रंजिनीची भेट घेतली. तसेच तिचा विश्वास संपादन केला. यावेळी रंजिनीने तिला डिव्हलबद्दल सांगितलंन यानंतर राजेशने तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजिनीने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. रंजिनी ही दवाखान्यातून  घरीनंतर राजेशने तिला भाड्याचे घर शोधण्यात मदत केली. त्याने हे नवीन घर रंजिनीच्या नातेवाईकांच्या घरापासून लांब अंतरावर घेतले. यावेळी घरच्यांपासून दूर राहिल्याने शेजारी व नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागणार नाही, अशी बतावणी राजेशने रंजिनीपुढे केली. १०  फेब्रुवारी २००६  रोजी राजेश रंजिनीच्या घरी गेला आणि तिची आई संथाम्माला स्थानिक पंचायत कार्यालयात जाण्यास सांगितले.  संथाम्मा यांना मुलांच्या जन्माशी संबंधित काही कागदपत्रे कार्यालयात द्यायची होती.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संथाम्मा पंचायत कार्यालयात गेल्यावर राजेशने रंजिनी आणि दोन मुलांची हत्या केली. पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला. यावेळी अनिल कुमार याचा देखील तपास सुरू करण्यात आला. पोलिसांना  घटनास्थळावरून दुचाकी नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. त्यावरून पोलिसांना पठाणकोटच्या लष्करी छावणीपर्यंत धागेदोरे मिळाले. अधिक चौकशी केली असता, राजेश आणि डिव्हिड हे एकाच पोस्टवर  तैनात होते अशी माहिती मिळाली. मात्र, दोघेही फरार होते. तब्बल १९ वर्ष हे दोघेही फरार होते. 

फरार आरोपी एआयमुळे सापडले 

केरळचे एडीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) मनोज अब्राहम म्हणाले, "आमची तांत्रिक गुप्तचर शाखा जुन्या प्रलंबित गुन्हांचे डिजिटल विश्लेषण करते. या पथकाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आरोपींचा शोध घेतला. १९ वर्षांनंतर ते कसे दिसत असतील हे पाहण्यासाठी  आरोपींची जुनी छायाचित्रे तयार करण्यात आली होती. एआयचा वापर करून चेहरा आणि हेअरस्टाईल याचा मेळ घालून  हे फोटो सोशल मीडियावरील फोटोंशी जुवळवण्यात आले. पोलिसांना  जगभरातून अनेक नागरिकांशी मिळते जुळते काही फोटो मिळाली. मात्र, फेसबुकवर शेअर केलेला एकाचा लग्नाचा फोटो ९० टक्के जुळला.

त्याआधारे तब्बल १९ वर्षांनंतर सीबीआयने ४ जानेवारीला डिव्हिल  आणि राजेशला अटक केली. विष्णू आणि प्रवीण नावाने ओळख बदलून  हे दोघे पुद्दुचेरीमध्ये लपून बसले होते. दोघांनी इंटिरिअर डिझाइनचे काम सुरू केले होते. तसेच या दोघांनी  शिक्षकांशी लग्न केले होते.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर