Lucknow Crime News Marahi : आपल्या पोटच्या पोरीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी नराधमाच्या किळसवाण्या कृत्याचा भांडाफोड झाला आहे. आरोपी गेल्या वर्षभरापासून आपल्याच मुलीला मारहाण आणि शिवीगाळ करत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गोमतीनगरमधील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या लखनौतील गोमतीनगरमध्ये राहणाऱ्या नराधमानं आपल्याच मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरापासून तरुणी बाथरुममध्ये अंघोळीसाठी जायची तेव्हा आरोपी तिच्यावर वाईट नजर टाकून बाथरुममध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. याशिवाय सातत्यानं तरुणीला मारहाण करत तिच्याशी छेडछाड करत असल्यामुळं तरुणीनं पोलिसांत तक्रार करण्याची धमकीही वडिलांना दिली होती. परंतु त्यानंतरही वडिलांनी तरुणीसमोर अश्लिल चाळे करणं थांबवलं नाही. त्यामुळं कंटाळलेल्या तरुणीनं घडलेला सारा प्रकार आपल्या आईजवळ सांगितला. या प्रकरणाबाबत पीडितेच्या आईनं पतीला जाब विचारला असता आरोपीनं पत्नीसह मुलीला बेदम मारहाण केली.
त्यानंतर आता पीडितेसह तिच्या आईनं आरोपी नराधमाविरोधात गोमतीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बापानंच आपल्या पोटच्या पोरीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानंतर लखनौतील गोमतीनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी आणि तिच्या आईचा जबाब नोंदवल्यानंतर आता पोलिसांनी आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.
संबंधित बातम्या