Do You Know: समुद्रातील कोणत्या भागाला पॉईंट निमो म्हटले जाते, जे असते सर्वात धोकादायक!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Do You Know: समुद्रातील कोणत्या भागाला पॉईंट निमो म्हटले जाते, जे असते सर्वात धोकादायक!

Do You Know: समुद्रातील कोणत्या भागाला पॉईंट निमो म्हटले जाते, जे असते सर्वात धोकादायक!

Feb 03, 2025 07:27 PM IST

Do You Know: जगभरातील अनेक देशांनी अवकाशात उपग्रह सोडले आहेत. पण हे उपग्रह खराब झाल्यानंतर त्यांना पॉईंट निमो येथे सोडले जातात.

समुद्रातील कोणत्या भागाला पॉईंट निमो म्हटले जाते, जे असते सर्वात धोकादायक!
समुद्रातील कोणत्या भागाला पॉईंट निमो म्हटले जाते, जे असते सर्वात धोकादायक!

What Is Point Nemo: अंतराळ जग हे रहस्यांनी भरलेले जग आहे. या रहस्यांची उकल करण्यासाठी विविध देशांच्या अंतराळ संस्था काम करतात. इतकेच नाही तर बहुतेक देशांनी आपले उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. आता प्रश्न असा पडतो की, इतके उपग्रह अयशस्वी झाल्यानंतर कुठे सोडले जातात? तर, त्या जागेला पॉईंट निमो असे म्हटले जाते. दरम्यान, आज आपण निमो पॉईंटबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

पृथ्वीवरील सर्वात निर्जन ठिकाणाला पॉइंट निमो असे म्हटले जाते. या ठिकाणी सर्व देशांचे शास्त्रज्ञ दोषपूर्ण उपग्रह सोडतात. म्हणजेच जे उपग्रह खराब होतात, अशा उपग्रहांना तिथे सोडले जाते. आता हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की ही जागा कोणी शोधली आहे. हे ठिकाण १९९२ मध्ये सर्वेक्षण अभियंता ह्रव्होजे लुकाटेला यांनी शोधले होते. आजही या ठिकाणी मनुष्य, प्राणी किंवा वनस्पती नाहीत. यामुळे खराब झालेले उपग्रह या ठिकाणी सोडले जातात. आतापर्यंत १०० हून अधिक उपग्रहाचे पार्ट या ठिकाणी सोडण्यात आले आहे, असेही म्हटले जाते.

पॉइंट निमोला उपग्रहांचे स्मशान देखील म्हटले जाते. बीबीसीच्या वृत्तानुसार, पॉइंट निमो हे दक्षिण प्रशांत महासागरातील न्यूझीलंड आणि चिली दरम्यान समुद्रातील एक ठिकाण आहे, जे जमिनीपासून सर्वात दूर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे ठिकाण जमिनीपासून २ हजार ६८८ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण समुद्रातील सर्वात दुर्गम बिंदू आहे. या ठिकाणापासून फक्त ४१५ किलोमीटर अंतरावर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. येथे कोणत्याही देशाचा अधिकार नाही.

पॉइंट निमो वरून जमिनीचा शोध घेतला तर सर्वात जवळचे बेट सुमारे २ हजार ७०० किलोमीटर दूर आहे. या ठिकाणाहून ४०० किलोमीटर वर चालत गेल्यास तुम्ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचाल.बीबीसीच्या अहवालानुसार, १९७१ ते २००८ दरम्यान, अमेरिका, रशिया, जपान आणि युरोपसारख्या देशांनी या ठिकाणी २६३ उपग्रह सोडले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर