पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार पीएनबीच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरती अंतर्गत एकूण १०२५ पदे भरली जाणार आहेत. येत्या ७ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, २५ फेब्रुवारी २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविले जातील.
पीएनबीमध्ये अधिकारी-क्रेडिट (१००० जागा), व्यवस्थापक-फॉरेक्स (१५ जागा) आणि वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा पदांच्या एकूण ५ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्कबाबत जाणून घेऊयात.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार येथे उपलब्ध सविस्तर अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
ही निवड ऑनलाइन लेखी चाचणीनंतर वैयक्तिक मुलाखत किंवा वैयक्तिक मुलाखतीवर आधारित असेल, जे प्रत्येक पदासाठी प्राप्त अर्जांच्या संख्येवर अवलंबून असेल. लेखी परीक्षा १०० गुणांची असेल आणि कालावधी २ तासांचा असेल. वैयक्तिक मुलाखत ५० गुणांची असेल.
एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांकडून ५० रुपये + जीएसटी १८ टक्के म्हणजेच एकून ५९ रुपये अर्ज शुल्क आकारला जात आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारांकडून १००० रुपये + जीएसटी १८ टक्के म्हणजेच १ हजार १८० रुपये आकारले जात आहेत.
उमेदवारांना डेबिट कार्ड (रुपे/व्हिसा/मास्टर कार्ड), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड/ मोबाइल वॉलेट किंवा यूपीआय वापरून स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन पेमेंट करता येईल.