PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच प्रत्येक महिन्याला ३०० यूनिट पर्यंत फ्री वीज (Free Bijli Yojana) देण्यासाठी पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना लाभ दिला जाईल. या योजनेसाठी केंद्र सरकार ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार लाभार्थ्यांना सब्सिडीही देणार आहे.
तुमच्या घरावर सोलर पॅनल इंस्टॉल केल्यानंतर सरकारकडून सब्सिडी दिली जाईल. घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी तुम्हाला https://pmsuryaghar. gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज (Apply For Free Electricity Scheme) करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
नेट मीटर इंस्टॉल झाल्यानंतर DISCOM कडून पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला कमीशनिंग सर्टिफिकेट जारी केले जाईल. याचा अर्ज तुम्ही या योजनेसाठी अर्ज केलेला आहे. मात्र सब्सिडी घेण्यासाठी तुम्हाला एक डॉक्यूमेंट अपलोड करावे लागेल. सर्टिफिकेट जारी झाल्यानंतर पोर्टलवर बँक अकाउंट डिटेल आणि कन्सल चेक जमा करावा लागेल. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कम जमा होईल.
किती मिळणार अनुदान?
पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) नुसार घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी एकूण ४७ हजार रुपये खर्च येईल. हा खर्च कमी करण्यासाठी सरकार लाभार्थ्यांना अनुदान देईल. हे अनुदान १८००० रुपये असेल. याचा अर्ज लाभार्थ्यांना २९००० रुपये खर्च करावे लागतील.