PM Modi Ayodhya Visit news update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या येथे भेट देणार आहे. त्यांची ही भेट ऐतिहासिक ठरणार आहे. या एकदिवसिय दौऱ्यात मोदी विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत तर काही कामाचे लोकार्पण करणार आहेत. आज मोदी यांच्या हस्ते येथील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या सोबत १५,७०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन ते करणार आहेत. पुनर्विकसित करण्यात आलेल्या अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक लोकार्पण आणि देशातील विविध स्थानकांवरून चालणाऱ्या ६ वंदे भारत आणि २ अमृत भारत रेल्वेला देखील ते हिरवा झेंडा दाखवतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज एकदिवसीय अयोध्या दौरा महत्वाचा आणि विशेष ठरणार आहे. मोदी आज अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करतील. या सोबत श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बंगळुरू, मंगळुरू-मडगाव, जालना-मुंबई आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल तसेच अयोध्या-दरभंगा आणि मालदा टाउन दरम्यान ६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना ते हिरवा कंदील दाखवतील. या सोबत बेंगळुरू दरम्यान २ अमृत भारत ट्रेनला देखील हिरवी झेंडा मोदी यांच्या हस्ते दाखवला जाणार आहे.
मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग २७ च्या लखनौ-अयोध्या विभागाचे रुंदीकरण, अयोध्या बायपासचे १२१ किमीचे रुंदीकरण या कामाची देखील पाहणी करतील. १७ जानेवारीपासून अयोध्या ते बेंगळुरू आणि कोलकाता यांना जोडणारी थेट उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला एअरलाइनने अयोध्या ते दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.
पंतप्रधान मोदी सकाळी १०.४० च्या सुमारास विमानतळावर पोहोचतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, बृजेश पाठक आणि त्यांच्या सरकारमधील इतर मंत्रीही स्वागत करतील. यानंतर पंतप्रधान मोदी धर्मपथ आणि रामपथावर १५ किमी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ११.३० वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचतील.
संबंधित बातम्या