Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री राम जन्मभूमी मंदिराच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण केले. त्याचबरोबर त्यांनी जगभरातील प्रभू रामाच्या तिकीटांचे एक पुस्तकही प्रकाशित केले. पोस्ट तिकीटावर राम मंदिर, चौपाई' मंगल भवन अमंगल हारी', सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या परिसरातील मूर्तींचा समावेश करण्यात आला आहे. भारत-अमेरिकेसह एकूण २१ देशात प्रभू रामाचे पोस्ट तिकीट जारी केले आहे.
पंतप्रधान मोदींनी रामाच्या पोस्ट तिकीटांचे एक पुस्तकही जारी केले आहे. त्यामध्ये ६ तिकीटांचा समावेश आहे. राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायु, केवटराज आणि शबरी यांच्यावर टपाल तिकीट काढण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या व्हिडियो संबोधनात म्हटले की, आज राम मंदिराशी संबंधित ६ स्मारक डाक तिकीटे जारी केली आहेत. त्याचबरोबर प्रभु श्रीरामाशी संबंधित डाक तिकीटे जारी केली आहेत. त्याचा एक अल्बम जारी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, पोस्टल स्टँपचे कार्य आम्ही सर्वजण जाणतो. मात्र पोस्टल स्टँप आणखी एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. पोस्टल स्टँप इतिहास आणि ऐतिहासिक क्षणांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम असते.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल. भगवान रामाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाईल.