पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!

Dec 22, 2024 05:57 PM IST

कुवैत आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्यात आला आहे. तब्बल ४३ वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानाने कुवेतला भेट दिली आहे. यावेळी त्यांना हा सन्मान देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍काराने सन्‍मान! (AFP)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या हस्ते कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' प्रदान करण्यात आला आहे. कुवैत आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तब्बल ४३ वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानाने कुवेतला भेट दिली असून या भेटीत मोदींना हा सन्मान देण्यात आला आहे.

कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'गार्ड ऑफ ऑनर'ने भव्य स्वागत केले. कुवेतमधील 'बायन' पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

मुबारक अल-सबाह यांच्या स्मरणार्थ कुवैत सरकारने १६ जुलै १९७४ रोजी या सन्मानाची स्थापना केली. १८९६ ते १९१५ या काळात त्यांना कुवेतचे शेख असे संबोधले जात असे. इ.स. १८९७ मध्ये कुवेतच्या बाजूने ऑटोमन साम्राज्यापासून स्वातंत्र्याची मान्यता मिळविण्यात त्यांना यश आले होते.

कुवैत आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये व्यापार आणि वाणिज्य हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारात वाढ झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. व्यापार आणि वाणिज्य हे आमच्या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. आमचे द्विपक्षीय संबंध सातत्याने वाढत आहेत. आमची ऊर्जा भागीदारी आमच्या द्विपक्षीय व्यापारात एक अद्वितीय मूल्य जोडते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवैत दौऱ्यावर आहेत. गेल्या ४३ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. 'मेक इन इंडिया' उत्पादनांमध्ये, विशेषत: ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल मशिनरी आणि टेलिकॉम क्षेत्राचा कुवेतमध्ये नवीन शिरकाव झाल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे. भारत आज सर्वात स्वस्त दरात जागतिक दर्जाची उत्पादने तयार करत आहे. तेलाशिवाय अन्य व्यापारात विविधता आणणे ही द्विपक्षीय व्यापार वाढविण्याची गुरुकिल्ली असल्याचे मोदी म्हणाले.

फार्मास्युटिकल, आरोग्य, तंत्रज्ञान, डिजिटल, इनोव्हेशन आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याची मोठी क्षमता आहे. दोन्ही बाजूच्या व्यापारी मंडळे, उद्योजक आणि नवप्रवर्तकांनी एकमेकांशी अधिकाधिक संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर