पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, खर्गेंनी आम्हाला ४०० जागांचा आशीर्वाद दिला आहे. मी प्रार्थना करतो की, त्यांच्या ४० जागा वाचतील.मोदी म्हणाले की, ज्या काँग्रेसलाआपल्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. १० वर्षांत काँग्रेसने देशाला ११ व्या क्रमांकावर आणलं आहे. आम्ही १० वर्षांत पाचव्या क्रमांकावर आणलं. ही काँग्रेस आपल्याला आर्थिक धोरणांवर भाषण देत आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूअसूनराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं.
यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता.मोदींनी म्हटले होते की, एकच प्रॉडक्ट अनेक वेळा लाँच करण्याच्या नादात काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. देशाबरोबरच काँग्रेसही परिवारवादाचे परिणाम भोगत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, खर्गेंनी आम्हाला ४०० जागांचा आशीर्वाद दिला आहे. मी प्रार्थना करतो की, त्यांच्या ४० जागा वाचतील. मोदी म्हणाले की, ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. १० वर्षांत काँग्रेसने देशाला ११ व्या क्रमांकावर आणलं आहे. आम्ही १० वर्षांत पाचव्या क्रमांकावर आणलं. ही काँग्रेस आपल्याला आर्थिक धोरणांवर भाषण देत आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं.
यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता.मोदींनी म्हटले होते की, एकच प्रॉडक्ट अनेक वेळा लाँच करण्याच्या नादात काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. देशाबरोबरच काँग्रेसही परिवारवादाचे परिणाम भोगत आहे.
|#+|
ज्या काँग्रेसने सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना कधीही आरक्षण दिलं नाही. ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, ज्यांनी देशातील रस्त्यांना आणि चौकाचौकांना आपल्याच कुटुंबाची नावं दिली, तेच आपल्याला सामाजिक न्यायावर भाषण देत आहे.
जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिलं आहे. यावेळी मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे" असं मोदींनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या