Ram Mandir Pran Pratishta : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम लल्लाच्याप्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील तर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र असणार आहेत. यजमानाच्या रुपात त्यांनी मंगळवारी प्रायश्चित पूजन विधीत भाग घेतला. आता ते सात दिवस यजमानाच्या भूमिकेत असणार आहेत.
प्राण प्रतिष्ठापना करणाऱ्या ब्राह्मणांनी व मुहूर्तकारांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,राज्यपाल आनंदीबेन पटेल, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास, सरसंघचालक मोहन भागवत आणि डॉ. अनिल मिश्र आपल्या पत्नीसह मुख्य कार्यक्रमात २२ जानेवारी रोजी मंदिराच्या गर्भगृहात उपस्थित असतील.
पंतप्रधान मोदी गर्भगृहात आपल्या हातानेकुशाआणिश्लाकाओढतील. त्यानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. त्यादिवशी मोदी प्रभू रामाला भोग चढवतील तसेच आरती करतील.
राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येतील विवेक सृष्टी आश्रमामध्ये आजपासून धार्मिक विधीस प्रारंभ झाला आहे. काशीच्या पंडितांनी शरयू नदीमध्ये स्नान केल्यानंतर पूजा विधी सुरू केला आहे. प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे मुख्य यजमान डॉ. अनिल मिश्रा आणि मूर्ती घडवणारे अरुण योगीराज यावेळी उपस्थित होते. आजपासून सुरू झालेले धार्मिक अनुष्ठान २१ जानेवारीपर्यंत चालणार आहेत.
रामलल्लाची मूर्ती १८ जानेवारी रोजी मंदिराच्या गर्भगृहामध्ये चांदीच्या आसनावर स्थापित केली जाणार आहे. तसेच मागच्या ७० वर्षांपासून पूजन होत असलेली मूर्तीसुद्धा नव्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये दुपारी १२.२० च्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मुख्य अनुष्ठानास प्रारंभ होणार आहे. ही पूजा सुमारे ४० मिनिटे चालणार आहे.
संबंधित बातम्या