Modi Speech : पुढच्या निवडणुकीनंतर विरोधक लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत दिसतील; पंतप्रधान मोदींची जोरदार टोलेबाजी-pm narendra modi motion of thanks address in lok sabha ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi Speech : पुढच्या निवडणुकीनंतर विरोधक लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत दिसतील; पंतप्रधान मोदींची जोरदार टोलेबाजी

Modi Speech : पुढच्या निवडणुकीनंतर विरोधक लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत दिसतील; पंतप्रधान मोदींची जोरदार टोलेबाजी

Feb 05, 2024 07:46 PM IST

Narendra Modi Speech in Lok Sabha : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Narendra Modi Speech in Lok Sabha
Narendra Modi Speech in Lok Sabha

Narendra Modi Speech in Lok Sabha : ‘सध्याचा विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं माझ्या विरोधात कष्ट करतोय ते पाहता त्यांना लोकांचा आशीर्वाद नक्की मिळेल. आज ते ज्या उंचीवर आहेत, त्यापेक्षा जास्त उंचीवर जातील. पुढच्या निवडणुकीनंतर विरोधक सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत असतील,’ असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील तमाम विरोधकांना हाणला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत बोलत होते. त्यांनी नेहमीच्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या धोरणांवर टीका करतानाच त्यांनी सध्याच्या विरोधकांनाही लक्ष्य केलं.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधकांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं होतं. तोच धागा पकडून मोदींनी आज विरोधकांवर प्रतिहल्ला केला. 'विरोधकांनी केलेले संकल्प पाहता त्यांनी दीर्घकाळ तिथंच बसण्याची तयारी केली आहे असं दिसत आहे. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे असं मी नेहमी म्हणत आलोय. काँग्रेसला उत्तम विरोधक बनण्याची मोठी संधी होती. दहा वर्षे हा कमी काळ नसतो. मात्र, ती जबाबदारी पार पाडण्यात काँग्रेस पुरती अपयशी ठरलीय, अशी टीका त्यांनी केली.

विरोधकांमध्ये लढण्याची उमेदच राहिलेली नाही!

‘विरोधी पक्षातील अनेकांना निवडणूक लढण्याची उमेदच राहिलेली नाही. अनेक लोक आपले मतदारसंघ बदलण्याचा विचार करत आहेत. आता अनेकांना लोकसभेऐवजी राज्यसभेत जावंसं वाटतं,’ असा टोलाही त्यांनी हाणला. 'मल्लिकार्जुन खर्गे एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात गेले. गुलाम नबी आझाद पक्षातूनच बाजूला झाले. एकच प्रॉडक्ट लाँच करण्याच्या प्रयत्नात दुकानाला टाळा लावण्याची वेळ आलीय, असं मोदी म्हणाले.

एनडीएचा तिसरा कार्यकाळ मोठ्या निर्णयांचा असेल!

भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार देशात तिसऱ्यांदा येणार हे निश्चित आहे. हा तिसरा कार्यकाळ मोठ्या निर्णयांचा असेल. मला आपला देश पुढची हजार वर्षे समृद्धी आणि यशाच्या शिखरावर पाहायचा आहे, असं मी याआधीही म्हणालो होतो. एनडीएचा तिसरा कार्यकाळ हा पुढील १०० वर्षांचा भक्कम पाया घालणारा असेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

ही कामं पूर्ण व्हायला १०० वर्षे लागली असती - मोदी

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेतला. 'आम्ही गरिबांसाठी ४ कोटी घरे बांधली. शहरी गरिबांसाठी आम्ही ८० लाख पक्की घरे बांधली. हे सगळं काँग्रेसच्या गतीनं केलं असतं ही कामं पूर्ण व्हायला १०० वर्षे लागली असती. तोपर्यंत पाच पिढ्या निघून गेल्या असत्या, असं मोदी म्हणाले.

विभाग