PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊरुसाच्या निमित्ताने अजमेर शरीफ दर्ग्याला चादर भेट दिली आहे. ही चादर १३ जानेवारी रोजी ख्वॉजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्यात चढवली जाईल. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया अकांऊटवरून ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुस्लिम समुदायाच्या एका शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी एक चादर भेट दिली. ती सूफी संत मोइनुद्दीन चिश्ती यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अजमेर शरीफ दर्ग्यात ठेवली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर लिहिले की, मी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मुस्लिम मोर्चाशी संवाद साधल्यानंतर त्यांनी चादर भेट केली. जी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या ऊरुसाच्या निमित्त अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवली जाईल.यावेळी अल्पसंख्यक कल्याण मंत्री स्मृती इराणी आणि दिल्ली हज कमेटीच्या प्रमुख कौसर जहां यांच्यासह अन्य लोक उपस्थित होते.
मोदी प्रत्येक वर्षी चादर चढवतात -
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वर्षी ऊरुसाच्या निमित्त अजमेर दर्ग्याला चादर चढवतात. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत ९ वेळा अजमेर दर्ग्याला चादर भेट दिली आहे. १३ जानेवारी रोजी पंतप्रधानांनी दिलेली चादर दर्ग्यात ठेवली जाईल.
१३ ते २१ जानेवारी दरम्यान ८१२ व्या ऊरुसाचे आयोजन -
यंदा अजमेर शरीफ दर्ग्यात८१२ वा ऊरुस साजरा केला जात आहे. हा ऊरुस १३ ते २१ जानेवारीपर्यंत चालेल. या दरम्यान ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्यात हजारोंच्या संख्येने लोक येत असतात.
संबंधित बातम्या