narendra modi : "आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरूय..", मोदींकडून काँग्रेसच्या ‘शीर्षासन’ राजकारणाची खिल्ली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  narendra modi : "आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरूय..", मोदींकडून काँग्रेसच्या ‘शीर्षासन’ राजकारणाची खिल्ली

narendra modi : "आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरूय..", मोदींकडून काँग्रेसच्या ‘शीर्षासन’ राजकारणाची खिल्ली

Jul 02, 2024 07:52 PM IST

Narendra Modi in Lok sabha : आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहेआणि हे काम काँग्रेसचे लोक व त्यांची इकोसिस्टिम करत असल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांवर थेटहल्लाबोल केला.

लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PTI)

संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा पराभव विजय म्हणून मांडल्याबद्दल काँग्रेसची खिल्ली उडवली.  मोदींनी आपल्या संबोधनात मोदींनी नेहमीप्रमाणे काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि हे काम काँग्रेसचे लोक व त्यांची इकोसिस्टिम करत असल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांवर थेट हल्लाबोल केला.

मोदी म्हणाले, की, काँग्रेसचा तिसरा सर्वात मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा शंबरचा टप्पा पार करता आला नाही. त्यांची आतापर्यंतची तिसरी सर्वात वाईट कामगिरी आहे. काँग्रेसने या निवडणुकीत झालेला आपला पराभव स्वीकारला असता, जनतेने दिलेल्या जनादेशाचे आत्मपरीक्षण केले असते, तर बरे झाले असते. मात्र ते शीर्षासन करण्यात व्यस्त असून आमचा पराभव केल्याचे जनतेला सांगत आहेत. असे करून ते बालकाचे मनोरंजन करण्याचे काम करत आहेत.

ते शीर्षासन करण्यात व्यस्त आहेत आणि त्यांची यंत्रणा भारतातील नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे की,  त्यांनी आम्हाला पराभूत केले आहे. 'शीर्षासन' ही योगासने हेडस्टँड म्हणून ओळखली जातात, ज्याचा अर्थ उलट्या किंवा विकृत कृतींचा आहे. मोदींनी या कृतींची तुलना मुलांचे लक्ष विचलित करण्याशी करत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला.

लहान मुलगा सायकलवरून पडला की मोठे म्हणतात, 'बघा, मुंगी मेली, पक्षी उडून गेला'. तसे यांच्याकडून केले जात आहे. गेल्या चार दशकांतील पक्षाच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना मोदी म्हणाले की, १९८४ पासून झालेल्या १० लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकदाही २५० च्या खाली आली नाही. 

मोदी म्हणाले, मला एक घटना आठवते, एक मुलगा होता ज्याने ९९ गुण मिळवले होते आणि तो  सर्वांना दाखवत असे. ९९ ऐकल्यावर लोक त्याला खूप प्रोत्साहन द्यायचे. तेवढ्यात एक शिक्षक आला आणि म्हणाला तू मिठाई का वाटतोआहेस? त्याला १०० पैकी ९९ नव्हे तर ५४३ पैकी ९९ गुण मिळाले. आता त्या मुलाला कोण समजावून सांगणार की, तुम्ही अपयशात विश्वविक्रम केला आहे. राहुल गांधी सहानुभूती मिळवण्यासाठी नवे नाटक करत असल्याचा आरोप मोदींनी केला. 

राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत -

हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत, हे सत्य देशाला ठाऊक आहे, असे मोदी म्हणाले. ओबीसी लोकांना चोर म्हटल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात बेजबाबदार वक्तव्य केल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली. थोर स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देश त्यांना सांगत आहे, तुमसे ना हो पाएगा.

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर