Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला-pm narendra modi bows down seeks blessings padma awardee purnamasi jani video ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

May 11, 2024 07:15 PM IST

Pm Narendra Modi : नरेंद्र मोदींनी भरसभेत ८०वर्षीय कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या पूर्णमासी जानी यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.

भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले
भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले

Pm Narendra modi Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज (शनिवार) ओडिशा राज्यातील कंधमाल येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी पद्म श्री पुरस्कार विजेत्या आदिवासी कवयित्री पूर्णमासी जानी यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. पूर्णमासी ८० वर्षीय कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी कुई, ओडिया आणि संस्कृत भाषेत ५० हजाराहून अधिक भक्ति गीते लिहिली आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करत २०२१ मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

पीएम मोदींनी कवयित्रींच्या पाया पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे पंतप्रधान मोदींचे कौतुक केले जात आहे. पूर्णमासी जानी यांना ताडिसरू बाई नावाने ओळखले जाते. पंतप्रधान मोदींनी यावेळी नारीशक्तीला सलाम केला. त्यांनी तुला बहरा यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी त्यांचा सत्कार केला. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावरही हल्लाबोल केला.

भाजप यावेळच्या लोकसभेत विक्रम करेल – मोदी 

नरेंद्र मोदींनी शनिवारी दावा केला की, भाजपा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत विक्रम करेल. यावेळी एनडीए ४०० चा आकडा पार पाडेल. मोदींनी ओडिशात आपल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. त्यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले की, राजपुत्र २०२४ मध्येही तेच भाषण देत आहेत जी २०१४ व २०१९ मध्ये करत होते.  यावेळी  काँग्रेस लोकसभेतील एकूण जागेपैकी १० टक्केही जागा मिळवू शकणार नाही. यामुळे यावेळीही काँग्रेस विरोधी पक्षाचा दर्जा मिळवू शकणार नाही.

मोदी नाही तर अमित शहा हे पुढचे पंतप्रधान - केजरीवाल

पंतप्रधान मोदी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम राबवत असून ४ जून रोजी भाजपाची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपामधीलही मोठे नेते राजकीय मंचावर दिसणार नाहीत. लोकसभेनंतर दोन महिन्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल, तर सप्टेंबर २०२५ नंतर अमित शाह देशाचे पंतप्रधान होतील, असा खळबळ जनक दावा केजरीवाल यांनी केला.

Whats_app_banner