LPG Cylinder Price Cut: जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) महिलांना खास भेट दिली आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. स्वत:नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.
मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार नाही, तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल, पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल", असेही मोदी म्हणाले.
मोदींनी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांच्या शक्ती, धैर्य आणि चिकाटीला सलाम केला आणि विविध क्षेत्रात त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. “आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आपल्या कामगिरीवरूनही हे दिसून येते."
जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ८ मार्च १९७५ रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली. हा दिवस महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
संबंधित बातम्या