मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Modi : देशाला लुटणाऱ्यांना सोडणार नाही; भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलण्याची मोदींची घोषणा!

PM Modi : देशाला लुटणाऱ्यांना सोडणार नाही; भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलण्याची मोदींची घोषणा!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 15, 2022 11:01 AM IST

PM Modi Speech Live : भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला केलेल्या संबोधनात केली आहे.

PM Narendra Modi Speech On Independence Day
PM Narendra Modi Speech On Independence Day (HT_PRINT)

PM Narendra Modi Speech On Independence Day : आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहे. त्यामुळं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात महिला सुरक्षा, एकता व अखंडता, आयटी आणि अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती अशा अनेक मुद्दे मांडले आहेत. परंतु आता त्यांनी आजच्या संबोधनात भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

भ्रष्टाचारावर काय म्हणाले मोदी?

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, देशात सध्या काही लोकांकडे रहायला जागा नाही, तर काही लोकांना चोरी केलेला पैसा ठेवायला जागा नाही, याआधीच्या सरकारच्या काळात चुकीच्या हातात जाणारा पैसा आमच्या सरकारनं थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया सुरू करत देशाच्या दोन लाख कोटी रुपयांची बचत केल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना सोडलं जाणार नसल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

बॅंका लुटून पळणाऱ्यांना परत आणणार- PM मोदी

आधीच्या सरकारांच्या काळात देशात भ्रष्टाचार करून किंवा बॅंका लुटून अनेकजण विदेशात पळून जायचे, परंतु आता आमच्या सरकारनं त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या असून आता त्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या ७५ वा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं केंद्र सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पावलं उचलणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या संबोधनात केली आहे.

जगाला ज्या वस्तूची गरज आहे, ती भारतात तयार व्हायला हवी- पंतप्रधान मोदी

जगाला ज्या वस्तूची सर्वात जास्त गरज आहे, त्या वस्तूचं उत्पादन भारतात व्हायला हवं, हे माझं स्वप्न असून यासाठी खाजगी क्षेत्रातील लोकांनीही प्रयत्न करायला हवेत, असं मोदींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं सुरू केलेलं आत्मनिर्भर भारत अभियान हे अजेंडा नाही तर जनआंदोलन झाल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या