राजकारण जानेवारी २०२९ नंतर करूया! आता जनतेची कामं करू; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राजकारण जानेवारी २०२९ नंतर करूया! आता जनतेची कामं करू; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन

राजकारण जानेवारी २०२९ नंतर करूया! आता जनतेची कामं करू; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन

Jul 22, 2024 12:20 PM IST

PM Modi on Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सल्ला दिला आहे. पक्षासाठी जेवढी लढाई लढावी लागली, तेवढी लढली, असेही ते म्हणाले. आता देशासाठी लढायचे आहे. राजकारण २०२९ नंतर करू, सध्या जनतेची कामे करू असे मोदी म्हणाले.

राजकारण जानेवारी २०२९ नंतर करुयात! आता जनतेची कामे करू; अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधकांना पंतप्रधानांचा सल्ला
राजकारण जानेवारी २०२९ नंतर करुयात! आता जनतेची कामे करू; अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधकांना पंतप्रधानांचा सल्ला

PM Modi on Budget : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाआधी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे अधिवेशन सकारात्मक व्हावं अशी देशवासियांची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. भारताच्या लोकशाहीचा प्रवास महत्वाचा आहे. हा प्रवास महत्त्वाचा टप्पा म्हणून मी पाहत आहे. मला व माझ्या सहकाऱ्यांसाठी ही गर्वाची बाब आहे की ६० वर्षानंतर एखादं सरकार तिसऱ्यांदा पुन्हा आले आहे. तिसऱ्या कार्याकाळातलं पहिला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळावी ही भारतीय लोकशाहीच्या प्रवासातली अभिमानास्पद बाब आहे.

हे अधिवेशन देशवासीयांच्या स्वप्नांचा पाया रचणार आहे. आपल्या सर्वांचे काम देश बारकाईने पाहत आहे. तब्बल ६० वर्षांनंतर तिसऱ्यांदा सरकार आले, ही अभिमानाची बाब आहे. तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळणे ही अभिमानाची बाब आहे. देशवासीय याकडे प्रतिष्ठेची बाब म्हणून पाहत आहेत. मी देशवासीयांना जी हमी देत ​​आहे, त्याची अंमलबजावणी करणारा हा अर्थसंकल्प असेल. अमृतकाळाचा हा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प आपल्याला मिळालेल्या ५ वर्षांच्या संधीची दिशा ठरवेल. २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अर्थसंकल्प मजबूत पाया घालणार आहे, असे मोदी म्हणाले.

पुढचे पाच वर्ष देशासाठी समर्पित करा : मोदी

मोदी म्हणाले, जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने विकसित होत आहे, ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही ८ टक्के विकास दरासोबत पुढे जात आहोत. भारतात सकारात्मक दृष्टिकोन, गुंतवणूक आणि उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही सातत्याने ८ टक्के वेगाने विकास साधत आहोत. देशवासीयांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. आता पुढच्या ५ वर्षात पक्षासाठी नाही तर देशासाठी काम करण्याची जबाबदारी सर्व निवडून आलेल्या खासदारांची आहे. मी सर्व राजकीय पक्षांना पुढील पाच वर्ष हे देशासाठी समर्पित करण्यास सांगेन.

तुम्ही राजकारण हे जानेवारी २०२९ नंतर करा. तोपर्यंत देशातील गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकजूट होऊन कामाला लागू या. २०४७ चे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की २०१४ मध्ये काही खासदार ५ वर्षांसाठी निवडून आले. तर लोकांना १० वर्षे काम करण्याची संधी मिळाली. पण अनेक खासदार असे होते ज्यांना सभागृहात आपले म्हणणे मांडण्याची संधी देखील मिळाली नाही. कारण काही पंख नकारात्मकतेच राजकारण करत आहेत. त्यांनी त्यांचे अपयश झाकण्यासाठी सभागृहाचा गैरवापर केला. नवीन सदस्यांना संधी मिळावी असे मी आवाहन करेन. त्यांना बोलू दिले पाहिजे, असे देखील मोदी म्हणाले.

ज्याला सरकार चालवण्याचा जनादेश मिळाला आहे, त्याचा आवाज दाबण्यासाठी सभागृहात कसे प्रयत्न केले गेले हे तुम्ही पाहिलेच असेल. अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्या देशबांधवांनी आपल्याला देशासाठी इथे पाठवले आहे, हे विचार करण्यासारखे आहे. पक्षासाठी नाही. विरोधी विचार चुकीचे नाहीत, पण नकारात्मकता ही वाईट गोष्ट आहे. या गोष्टीचा त्यांना पश्चात्तापही देखील नाही. मी आज आग्रहपूर्वक सांगतो आहे, आम्हाला देशाच्या जनतेने देशासाठी पाठवलं आहे, पक्षासाठी नाही. १४० कोटी देशाच्या जनतेसाठी आम्ही येथे आलो आहोत. देशाच्या जनतेचे मी धन्यवाद देतो म्हणत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर