नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मोदींनी म्हटले की, भाजपचा कार्यकर्ता वर्षातील प्रत्येक दिवशी देशासाठी काही ना काही कर्तव्य पार पाडत असतो. मात्र पुढच्या १०० दिवसात नवीन ऊर्जा, नवा उत्साह व नव्या विश्वासाने काम करण्याची वेळ आहे. पीएम मोदी म्हणाले की, आज विरोधी पक्षाचे नेतेही NDA सरकार ४०० पारच्या घोषणा देत आहेत. NDA ला ४०० पार करण्यासाठी भाजपला ३७० जागांचा मैलाचा दगड पार करावा लागणार आहे. मोदी म्हणाले की, आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी लढत आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण देश मानतो की, आम्ही देशाला महाघोटाळे व दहशतवादी हल्लेच्या भयापासून मुक्ति दिली आहे. आम्ही गरीब आणि मध्यम वर्गाचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी म्हणाले की, आम्ही भाजपसाठी तिससा कार्यकाळ सत्ता भोगण्यासाठी मागत नाही. मोदी म्हणाले की, येत्या ५ वर्षात भारतासाठी आधीपासूनही अनेक पटीने वेगवान काम करायचं आहे.आगामी पाच वर्षात आम्हाला विकसित भारताच्या दिशेने मोठी झेप घ्यायची आहे.
भाजप कार्यकर्त्यांना येत्या १०० दिवसात प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचावे आणि सर्वांचा विश्वास संपादन करावा. सर्वांनी प्रयत्न केल्यावर भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून आणखी देशसेवा करता येईल.
पंतप्रधानमोदी म्हणाले की, दहा वर्षांत देशात अनेक कामे झाली आहेत तसेचअजून देशासाठी खूप काही साध्य करायची स्वप्ने आणि निर्णय बाकी आहेत. मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरुन देशातील शौचालयांवर भाष्य केले, महिलांच्या बाजूने बोललो, देशात विश्वकर्मा योजना सुरू केली. शतकानुशतके प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचे धाडस दाखवले. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून ५ शतकांची प्रतीक्षा संपवली. गुजरातमधील पावागडमध्ये ५०० वर्षांनंतर धार्मिक ध्वज फडकवण्यात आला. ७ दशकांनंतर आम्ही करतारपूर साहिब महामार्ग खुला केला आहे. ७ दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कलम ३७० मधून स्वातंत्र्य मिळाले आहे.
मोदी म्हणाले की, आमच्या दुसऱ्या कार्यकाळात एका जुन्या विरोधी नेत्याने तुम्ही आता विश्रांती घ्या, असे सांगितले होते. मी म्हणालो की आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी काम करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालतो. सत्ता उपभोगण्यासाठी मी तिसरी टर्म मागत नाही, तर राष्ट्रासाठी सत्तेत असल्याचं ते म्हणाले. पूर्वी सत्तेत असलेल्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले आणि पदोन्नती दिली. ही परंपरा आम्ही बदलली आहे.
काँग्रेस ही भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि अस्थिरतेची जननी आहे. त्यात ना विकासाचा अजेंडा आहे ना भविष्य. भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशाचे विभाजन करण्यात गुंतले आहेत.
संबंधित बातम्या