PM Narendra Modi: दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील ७५ हजार तरुणांना नोकरीची भेट देणार आहेत. व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून २२ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी ७५ हजार तरुणांना नोकरीच्या नियुक्तीचे पत्र दिले जाणार आहे. या नोकऱ्या वेगवेगळ्या मंत्रालयात दिल्या जाणार आहेत. यात संरक्षण, रेल्वे, पोस्ट, गृह, सीआयएसएफ, कामगार आणि रोजगार, सीबीआय, कस्टम, बँक, सीएएफ इत्यादींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात म्हटलं होतं की, पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत दहा लाख नोकऱ्या दिल्या जातील.
देशातल्या वेगवेगळ्या शहरांमधून केंद्रीय मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसंच खासदारसुद्धा त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमातून जोडले जातील. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविय, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, मंत्री महेंद्र पांडे, अर्जुन मुंडा, गिरीराज सिंह हे मंत्री कार्यक्रमात सहभागी होतील.
धनत्रयोदशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ४.५० लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशात व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी सांगितले की, २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सतना जिल्ह्यात पीएमएवायच्या ४.५० लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशावेळी व्हर्च्युअल उपस्थिती लावणार आहेत.
संबंधित बातम्या