पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण-पूर्व आशियाई देशांच्या दौऱ्या दरम्यान मंगळवारी ब्रुनेईतील बंदर सेरी बेगवान येथील प्रसिद्ध ओमर अली सैफुद्दीन मशिदीला भेट दिली. ब्रुनेईचे धार्मिक कार्य मंत्री पहिन दातो उस्ताज हाजी अवांग बदरुद्दीन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. ब्रुनेईचे आरोग्य मंत्री दातो डॉ. हाजी मोहम्मद इसम उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करण्यासाठी भारतीय समुदायाचे सदस्यही उपस्थित होते. या मशिदीचे नाव ब्रुनेईचे २८ वे सुलतान उमर अली सैफुद्दीन तिसरे (विद्यमान सुलतानचे वडील, ज्यांनी ही बांधले होते) यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि १९५८ मध्ये ते पूर्ण झाले.
उमर अली सैफुद्दीन मशीद ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान येथे आहे. ही मशीद ब्रुनेईतील सर्वात मोठी व पुरातन मशिदींपैकी एक आहे. याचे नाव उमर अली सैफुद्दीन तृतीय (१९१४-१९८६) यांच्या नावाने ठेवले आहे. ते ब्रुनेईचे २८ वे सुल्तान आणि सध्याचे सम्राट सुल्तान हसनल बोल्किया यांचे वडील होते. ही मशीद ब्रुनेईमधील इस्लामी आस्थेचे प्रतीक आहे.
मशिदीचे निर्माण -
मशीद बांधण्यासाठी जवळपास पाच वर्षे लागला होती. त्यावेळी त्याचा खर्च १ मिलियन पाउंड (११,००,०७,७०० रुपये) हून अधिक होती. या मशिदीचे निर्माण मलेशियातील आर्किटेक्चुअल फर्म बूटी एडवर्ड्स अँड पार्टनर्सने केली होती. या मशिदीचे बांधकाम ४ फेब्रुवारी १९५४ रोजी सुरू झाले होते. .साठी १,५०० टन काँक्रीट आणि ७०० टन स्टीलचा वापर केला आहे. या मशिदीचा पाय ८० ते १२० फूट खोल आहे.
उमर अली सैफुद्दीन मशिदीचे उद्घाटन २६ सप्टेंबर १९५८ रोजी सुल्तान उमर अली सैफुद्दीन तृतीय यांच्या ४२ व्या वाढदिवसी झाले. याची वास्तुकला भारतीय मुगल साम्राज्याच्या वास्तुकलेशी सुसंगत आहे. या मशिदीत दरवर्षी लाखों पर्यटक येत असतात.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी ब्रुनेई येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी दीपप्रज्वलन व फलकाचे अनावरण केले.
उद्घाटनाला उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला आणि दोन्ही देशांमधील जिवंत सेतू म्हणून आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
ब्रुनेईत दाखल होणाऱ्या भारतीयांचा पहिला टप्पा १९२० च्या दशकात तेलाच्या शोधापासून सुरू झाला. सध्या ब्रुनेईमध्ये सुमारे १४ हजार भारतीय वास्तव्यास आहेत. ब्रुनेईच्या आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्राच्या वाढीत आणि विकासात भारतीय डॉक्टर आणि शिक्षकांचे योगदान सर्वमान्य आहे.
बुधवारी मोदी ब्रुनेईचे सुलतान आणि पंतप्रधान हसनल बोलकिया यांच्याशी चर्चा करतील, जे अंतराळ आणि ऊर्जा या सारख्या क्षेत्रातील सहकार्यावर लक्ष केंद्रित करतील.
नवी दिल्लीच्या अंतराळ कार्यक्रमात ब्रुनेईला विशेष स्थान आहे. दोन्ही देशांनी या क्षेत्रात तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि २००० मध्ये भारताने ब्रुनेई येथे टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड स्टेशन ची स्थापना केली जी उपग्रह आणि रॉकेटच्या पूर्वेकडील सर्व प्रक्षेपणांचा मागोवा घेण्यास आणि देखरेख करण्यास अनुमती देते.
बोर्नियो बेटावर वसलेल्या ब्रुनेई या छोट्याशा देशाला द्विपक्षीय भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ब्रुनेईकडून गॅस पुरवठ्यासाठी दीर्घकालीन आणि अपेक्षित व्यवस्था करण्यास उत्सुक असल्याचे भारतीय पक्षाने म्हटले आहे.