मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'जगाला माहिती आहे, आएगा तो मोदी ही', पंतप्रधानांना आत्तापासूनच मिळत आहेत परदेशांतून ऑगस्ट-सप्टेंबरमधील निमंत्रणे

'जगाला माहिती आहे, आएगा तो मोदी ही', पंतप्रधानांना आत्तापासूनच मिळत आहेत परदेशांतून ऑगस्ट-सप्टेंबरमधील निमंत्रणे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 18, 2024 07:35 PM IST

PM Modi on Lok sabha Election : मोदींनी म्हटले की, जगभरातील देशही याबाबत आश्वस्थ आहेत की, भारतात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.

Pm modi 
Pm modi 

लोकसभा निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. याच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. भाजपकडून पंतप्रधान मोदींनी आजच्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मोदींनी म्हटले की, जगभरातील देशही याबाबत आश्वस्थ आहेत की, भारतात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.

मोदी म्हणाले की, निवडणूक अजून झाली नाही, मात्र माझ्याकडे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील परदेशातून निमंत्रणे येत आहेत. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ आहे की, अन्य देशानांही भाजप सरकार सत्तेत परतणार असल्याची खात्री आहे. त्यांनीही माहिती आहे की, 'आएगा तो... मोदी ही!'" 

पीएम मोदी यांनी म्हटले की, अनेक देशांशी आमचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत. पाच आखाती देशांनी मला त्यांच्या देशांतील सर्वोच्च सन्मान दिला आहे. हा पंतप्रधान मोदींचा सन्मान नसून १४० कोटी देशवासीयांचा सन्मान आहे. भारत ३  ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनली आहे. त्यांनी म्हटले की, भारताला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी जवळपास ६० वर्षे लागली. २०१४ मध्ये जेव्हा जनतेने आम्हाला सत्ता दिली तेव्हा २ ट्रिलियनचा आकडाही कठीण वाटत होता. मात्र १० वर्षात आम्ही अर्थव्यवस्था ३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवली. २०१४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या नंबरवर होती. ती ५ व्या स्थानावर आणण्यासाठी आम्हाला केवळ १० वर्षे लागली.

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातून काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी त्यांनी भारताला राफेल मिळू नये म्हणून प्रयत्न केले. HAL ला नष्ट केले जात आहे, अशी चुकीची माहिती पसरवली. आज HAL चे बाजारमूल्य किती वाढले आहे, ते बघा. हे तेच लोक आहेत ज्यांनी एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले होते. काँग्रेस किती गोंधळात आहे, याचे उदाहरण म्हणजे, काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आहे. 

मोदी म्हणाले की, ही सिद्धांताची लढाई नाही. काँग्रेसमध्ये सैद्धांतिक विरोध करण्याचे धाडसही उरलेले नाही. काँग्रेस केवळ मोदींना विरोध करण्यापूरतीच उरली आहे.

IPL_Entry_Point