मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अंदमान निकोबार द्वीप समुहातील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांनी नावे, पंतप्रधान मोदींची घोषणा

अंदमान निकोबार द्वीप समुहातील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांनी नावे, पंतप्रधान मोदींची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2023 11:03 PM IST

Name of 21islandsofAndamanandnicobar: अंदमान निकोबार द्वीपसमुहातील २१ बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

नवी दिल्‍ली–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पराक्रम दिवसाच्या निमित्त अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील २१ सर्वात मोठ्या निनावी बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली. या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेत पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीपवर निर्माण केल्या जाणाऱ्या नेताजी राष्‍ट्रीय स्‍मारकाच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन केले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस २३ जानेवारी पराक्रम दिवसाच्या रुपात साजरा केला जात आहे.

पीएम मोदींनी या प्रसंगी म्हटले की, आज परमवीर चक्र विजेत्यांची नावे बेटांना दिल्याने ही बेटे येणाऱ्या पीढीसाठी प्रेरणास्थान बनतील. दिल्ली आणि बंगालपासून अंदमान-निकोबार द्वीप समुहापर्यंत संपूर्ण देश नेताजींना श्रद्धांजलि अर्पण करत आहे. त्याच्या विचारधारेला  जपत आहे. लोक स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास जाणण्यासाठी अंदमान जात आहेत. अंदमान-निकोबार बेटावर नेताजींचे स्मारक लोकांच्या हृदयात देशप्रेमाची ज्वाला जागृत करेल. नेताजी संबंधित गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी होत होती. आम्ही ते केले आहे.

 

 

या परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवली बेटांची नावे –

अंदमानव निकोबार द्वीप समूहातील सर्वात मोठ्या द्वीपचे नामकरण प्रथम परमवीर चक्र विजेत्याच्या नावावर केले गेले. अशाप्रकारे आकाराच्या दृष्टीने अन्‍य बेटांचे नामकरण करण्यात आले. ज्या परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने बेटांची नावे ठेवली गेली आहेत, त्यामध्ये मेजर पीरू सिंह, कॅप्टन जीएस सलारिया, लेफ्टनंट कर्नल धान सिंह थापा, सुबेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशिर बुर्जोरजी तारापोर, लान्सनायक अल्बर्ट एक्का,मेजर होशियार सिंह, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल,फ्लाइंग ऑफिसर निर्मल सिंह शेखों, मेजर परमेश्वरम, नायब सुबेदार बना सिंह, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टिनंट मनोज कुमार पांडे, सुबेदार मेजर संजय कुमार, सुबेदार मेजर योगेंद्र सिंह यादव आदि नाव सामील आहेत.

...शहीद द्वीपआणिहेवलॉक द्वीपचे नावस्‍वराज द्वीप ठेवले होते –

पंतप्रधान कार्यालयानुसार, बेटांचे हे नामकरण राष्ट्राची एकता व अखंडतेसाठी सर्वोच्‍च बलिदा देणाऱ्या नायकांनाश्रद्धांजलीच्या रुपात केले गेले आहे. अंदमान व निकोबार द्वीप समूहाचे ऐतिहासिक महत्‍व आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्‍मृतीप्रित्यर्थ २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांनीरॉस द्वीपचे नामकरण नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप केले होते. त्याचबरोबरनील द्वीपचे नाव बदलून शहीद द्वीप आणि हेवलॉक द्वीपचे नाव स्‍वराज द्वीप ठेवले होते.

IPL_Entry_Point