Modi-Zelenskyy Meeting : मोदी व युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की G-7 मध्ये भेटले, मोदी म्हणाले, युद्ध माझ्यासाठी..VIDEO
Pm modi meets zelenskyy : पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी जापानमधील शहरहिरोशिमामध्ये सुरू असलेल्या जी-७ शिखरसंमेलनातयूक्रेनचेराष्ट्राध्यक्ष व्लाडिमिरझेलेंस्कीयांची भेट घेऊन त्यांच्याशी युद्धाबाबत चर्चा केली.
हिरोशिमा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जापानमधील शहर हिरोशिमामध्ये सुरू असलेल्या जी-७ शिखर संमेलनात यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लाडिमिर झेलेंस्की यांची भेट घेऊन त्यांच्याशी युद्धाबाबत चर्चा केली. त्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, फ्रांसचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन आणि व्हियनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. भारत आणि यूक्रेनच्या वरिष्ठ राजदुतांच्या चर्चा व बैठकांनंतर मोदी आणि झेलेंस्की यांच्यात बैठक निश्चित करण्यात आली होती. २०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात यूक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी व झेलेंस्की यांच्यातील ही समोरा-समोर झालेली पहिलीच बैठक आहे.
ट्रेंडिंग न्यूज
झेलेंस्की यांना काय म्हणाले पंतप्रधान मोदी -
झलेंस्की यांच्याशी भेट झाल्यानंतर मोदी म्हणाले की, यूक्रेन युद्ध जगातील सर्व देशासाठी एक मोठी समस्या आहे. मी या समस्येला केवळअर्थव्यवस्थेचा किंवा राजकीय मुद्दा मानत नाही. हा माझ्यासाठी मानवतेचा मुद्दा आहे. भारत देश आणि मी या युद्धाच्या समाधानासाठी जे काही करू शकतो ते सर्व करेन.
जी-७ संमेलन -
पंतप्रधान मोदी आपल्या तीन देशांच्या दौऱ्यापूर्वी जी ७ समूहाच्या वार्षिक शिखरसंमेलनात भाग घेण्यासाठी शुक्रवारी हिरोशिमामध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया देशाचा दौरा करणार आहेत. जी-७ समूहाचे सध्याचे अध्यक्ष जपानच्या निमंत्रणानंतर यूक्रेनचे राष्ट्रपतीही या शिखरसंमेलनात सहभाग झाले आहेत. यूक्रेनचेराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे सचिव ओलेक्सी डेनिलोव यांनी खुलासा केला होता की, झलेंस्की जपानमध्ये आयोजित शिखर संमेलनात सहभागी होतील. त्यापूर्वी ते व्हिडिओ कांफ्रेंसिंगच्या माध्यमातून सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या.
जी-७ परिषदत गाजला रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दा -
डेनिलोव यांनी शुक्रवारी राष्ट्रीय टेलीव्हिजनवर म्हटले होते की, आम्हाला विश्वास होता की, आमचे राष्ट्रपती तेथे जरुर उपस्थित राहतील, जेथे यूक्रेनला जगातील कोणत्याही भागात त्यांची आवश्यकता भासेल. जेणेकरून आपल्या देशाच्या स्थिरतेच्या मुद्द्याचा यशस्वी निपटारा केला जाऊ शकले. डेनिलोव यांनी म्हटले की, तेथे अनेक महत्वपूर्ण प्रकरणांचा निकाल लावला जाईल. बैठकीत जी-७ देशांच्या नेत्यांनी रशियावर आणखी कडक निर्बंध लादणे व बहिष्कार टाकण्यावर चर्चा केली. यावेळी यूक्रेनची हरसंभव मदत करण्यावरही एकमत झाले.