PM Modi visits Assam Kaziranga National Park: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे असाम आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली.
(1 / 5)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे असाम आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली. पंतप्रधान मोदींनी उद्यानाच्या 'मध्य कोहोरा रेंज'च्या मिहिमुख परिसरात प्रथम हत्तीची सवारी घेतली. त्यानंतर जीपने सफारी केली.
(2 / 5)
जंगल सफारीदरम्यान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्यान संचालक सोनाली घोष आणि इतर वरिष्ठ वन अधिकारीही होते. राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान शुक्रवारी संध्याकाळी काझीरंगा येथे पोहोचले होते.
(3 / 5)
आसाममध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काझीरंगा नॅशनल पार्कमधील सेंट्रल कोहोरा रेंजजवळील पोलिस गेस्ट हाऊसमध्ये रात्र काढली. यानंतर पहाटे उद्यानाच्या फेरफटका मारण्यास निघाले. तिथे पीएम मोदी जवळपास दोन तास होते.
(4 / 5)
पीएम मोदी आज दुपारी जोरहाटमध्ये प्रसिद्ध अहोम जनरल लचित बारफुकन यांच्या १२५ फूट उंच 'स्टॅच्यू ऑफ शौर्य'चे उद्घाटन करणार आहेत.
(5 / 5)
त्यानंतर मोदी जोरहाटमधील मेलेंग मेटेली पोथर येथे जातील जेथे ते सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या केंद्र आणि राज्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान एका जाहीर सभेलाही संबोधित करतील आणि त्यानंतर ते पश्चिम बंगालला रवाना होतील.