मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mission Divyastra : पंतप्रधान मोदींकडून DRDO शास्त्रज्ञांचं अभिनंदन, काय आहे मिशन दिव्यास्त्र?

Mission Divyastra : पंतप्रधान मोदींकडून DRDO शास्त्रज्ञांचं अभिनंदन, काय आहे मिशन दिव्यास्त्र?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 11, 2024 07:05 PM IST

PM Modi On Mission Divyastra : पंतप्रधान मोदींनी मिशन दिव्यास्त्रची यशस्वी चाचणी केल्याबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केले आहे. मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याने आता एकाच क्षेपणास्त्राला विविध ठिकाणी अनेक युद्ध आघाड्यांवर तैनात करता येणार आहे.

मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार
मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार

Pm Modi On Mission divyastra : लोकसभा निवडणुकीच्या तोंडांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधन करत मोठी घोषणा करणार असल्याचे वृत्त होतं. सायंकाळ साडे पाच वाजता मोदी देशाला संबोधित करणात होते. मात्र त्याच सुमारास पंतप्रधान मोदींनी डिआरडीओचं मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याची घोषणा ट्विट करून दिली. तसेत DRDO च्या शास्त्रज्ञांचं ट्विटच्या माध्यमातून अभिनंदनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी मोठी घोषणा करणार होते ती हीच होती. तसेच आता पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. 

मिशन दिव्यास्त्र म्हणजे एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह स्वदेशीर रूपात विकसित केलेल्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी होती. ती यशस्वी झाली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रासह स्वदेशी रूपात विकसित अग्नी -५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी, मिशन दिव्यास्त्र यशस्वी करून दाखवल्याबद्दल मला DRDO च्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे.  

एमआयआरव्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणत्या क्षेपणास्त्रामधून एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर या शस्त्रांनी वेगवेगळे लक्ष्य भेदता येणार आहेत. याचे वैशिष्ट्ये म्हणजे रस्ते मार्गाने हे कोठेही नेले जाऊ शकते. यापूर्वीच्या अग्नि क्षेपणास्त्रांमध्ये ही सुविधा नव्हती. या प्रोजेक्टची संचालक महिला असून संपूर्ण प्रकल्पात महिलांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. 'मिशन दिव्यास्त्र' च्या यशस्वी चाचणीनंतर भारत अशा मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, ज्यांच्याकडे एमआयआरवीची अद्भुत क्षमता आहे. 

IPL_Entry_Point