मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BBC Documentary : मोदींवरील BBC च्या माहितीपटाचे हैद्राबात विद्यापीठात स्क्रीनिंग; जेएनयूतही होणार सादरीकरण

BBC Documentary : मोदींवरील BBC च्या माहितीपटाचे हैद्राबात विद्यापीठात स्क्रीनिंग; जेएनयूतही होणार सादरीकरण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 24, 2023 09:35 AM IST

BBC Documentary On Gujarat Riots : गुजरात दंगलीवर बीबीसीनं एक माहितीपट प्रदर्शित केला होता. हा माहितीपटावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. असे असतांनाही हैद्राबात विद्यापीठात हा माहितीपट दाखवण्यात आला आहे. तर जेएनयू विद्यापीठातही हा माहितीपट आज दाखवला जाणार आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मोदींवरील BBC च्या माहितीपटाचे जेएनयूतही होणार सादरीकरण
मोदींवरील BBC च्या माहितीपटाचे जेएनयूतही होणार सादरीकरण

BBC Documentary On 2002 Gujarat Riots : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर 'इंडिया- द मोदी क्वेशन' नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला आहे. त्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं बीबीसीच्या या माहितीपटावर यूट्यूबसह ट्विटरवरही बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. हा माहितीपट दाखवण्यावर बंदी असतांना देखील हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांनी या महितीपटाचे स्क्रीनिंग केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान जेएनयू विद्यापीठातही हा माहितीपट दाखवला जाणार आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने ह्याला मान्यता दिलेली नाही.

केंद्र सरकारने बीबीसीच्या माहितीपटावर बंदी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी हैदराबाद विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी गुजरात दंगलीवरील माहितीपट सामूहिकपणे पाहिल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आसून विद्यार्थ्यांनी मात्र, हे आरोप फेटळले आहेत. विद्यापीठ प्रशासन या प्रकरणी चौकशी करणार आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद झाली नसल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे.

जेएनयूमध्ये आज रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान, या महितीपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. मात्र, याला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. या मुळे विद्यापीठातील शांतता भंग होऊ शकते असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर हा व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

बीबीसीने 'इंडिया : द मोदी क्वेस्चन' नामक माहिती पट हा दोन भागात बनवला आहे. यात मोदी यांचा राजकारनातील प्रवेश आणि पक्षातील वाढते स्थान आणि गोध्रामधील रेल्वे जळीतकांडानंतर गुजरातमधील अनेक भागांमध्ये उसळलेल्या दंगलीबाबत राजकीय नेते, पत्रकार, दंगलीत प्राण गमावलेल्यांचे नातेवाईक आणि तुरुंगात असलेले पोलीस अधिकारी संजीव भट यांच्या मुलीची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. गुजरात दंगलीत निष्पाप लोकांचा जीव जात असताना तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका संशयास्पद होती, अशा प्रकारचं चित्रण बीबीसीच्या माहितीपटात करण्यात आलं आहे. या माहिती पटात इंग्लंडचे माजी विदेश सचिव जॅक स्त्रा यांची मुलाखत आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की इंग्लंडच्या सरकारने गुजरात दंगलीची चौकशी केली होती.

गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या काळात तात्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर बीबीसीनं माहितीपटातून प्रपोगंडा दाखवल्याचा आरोप करत सरकारनं भारतात त्याच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.

IPL_Entry_Point

विभाग