पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना प्रत्येक महिन्याला ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज प्रदान करण्यासाठी मंगळवारी ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ जाहीर केली. मोदींनी ‘एक्स’ वर सविस्तर पोस्ट करत म्हटले की, शाश्वत विकास व लोकांच्या हितासाठी पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना सुरू केली जात आहे.
मोदींनी म्हटले की, ७५ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या या योजनेचा उदेश्य प्रत्येक महिन्याला ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करून १ कोटी घरे प्रकाशमान करणे आहे. मोदींनी म्हटले की, लोकांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफरपासून सवलतीच्या दरात बँक कर्ज उपलब्ध करण्याबाबत करणार विचार करत आहे. जेणेकरून या योजनेच्या खर्चाचा बोझ पडणार नाही.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आली होती.
स्थानिक पातळीवर ही योजना लोकप्रिय करण्यासाठी विविध शहरी संस्था आणि पंचायतींना रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तसेच या योजनेच्या माध्यमातून लोकांचे वीज बिल कमी होईल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. यावेळी पंतप्रधान मोदींनी सौर ऊर्जेचा प्रचार आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सर्व ग्राहकांना, विशेष करून तरुणांना आवाहन केले की, त्यांनी ‘पीएमसूर्यघर डॉट जीओव्ही डॉट इन’वर अर्ज करून पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना लोकप्रिय करावी.