अयोध्या (Ayodhya) मध्ये राम लल्लाची प्राण-प्रतिष्ठा केल्यानंतर दिल्लीत दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने देशातील १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर लावण्याचे उदिष्ठ ठेवले आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर याची घोषणा करताना म्हटले की, केंद्र सरकार 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' सुरू करणार आहे. या योजनेला प्रभू रामाशी जोडताना त्यांनी म्हटले की, सूर्यवंशी प्रभू श्रीरामापासून जगातील सर्व भक्त सदैव ऊर्जा प्राप्त करतात.
पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले की, आज अयोध्येत प्राण-प्रतिष्ठेच्या मंगल समयी माझा संकल्प केला आहे की, भारतवासीयांच्या धरावर त्यांच्या हक्काचे सोलर रूफ टॉप सिस्टम असेल. अयोध्येहून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे. आमची सरकार १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर लावणार आहे. पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू केली जाणार आहे.
अयोध्येतून परतताच पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत एक बैठक बोलावली होती. त्यानंतर गरीब व मध्यम वर्गासाठी ही मोठी घोषणा केली. पंतप्रधानांनी म्हटले की, यामुळे विजेचे बिल कमी येईल. त्याचबरोबर भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल.