वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून मला.. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आणखी एका प्लेबॉय मॉडेलचा खळबळजनक दावा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून मला.. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आणखी एका प्लेबॉय मॉडेलचा खळबळजनक दावा

वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून मला.. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आणखी एका प्लेबॉय मॉडेलचा खळबळजनक दावा

Feb 02, 2025 08:48 PM IST

प्लेबॉय मॉडेल आणि अभिनेत्री पामेला अँडरसनने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला येण्यासाठी पैसे देण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.

पामेला अँडरसन व डोनाल्ड ट्रम्प
पामेला अँडरसन व डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज चर्चेत असतात. निवडणुकीदरम्यान स्टॉर्मी डॅनियल्स या अॅडल्ट स्टारने त्याच्यावर सेक्ससाठी पैसे दिल्याचा आरोप केला होता. तेव्हा ट्रम्प यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता आणखी एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल पामेला अँडरसनने ट्रम्प यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

बेवॉचची (Baywatch) माजी स्टार पामेला अँडरसन नुकतीच जिमी किमेल लाईव्ह (Jimmy Kimmel Live) शोमध्ये दिसली, जिथे तिने ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल मोठा दावा केला. ट्रम्प यांच्या पार्टीत आमंत्रित करण्यासाठी पैसे देण्यात आल्याचे तिने सांगितले. प्लेमेट म्हणून त्याच्याकडे रोज एक ठराविक दर असायचा.

फेब्रुवारी १९९० मध्ये प्लेबॉय मॅगझिनच्या प्लेमेट ऑफ द मंथ (Playmate of the Month) म्हणून निवड झाल्यानंतर पामेला अँडरसन प्रसिद्धीस आली. त्यानंतर ती मासिकाच्या मुखपृष्ठावर अनेकदा झळकली. ५७ वर्षांची पामेला अँडरसन सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द लास्ट शोगर्ल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लाइव्ह शोमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान तिने तिच्या प्लेबॉय मॉडेलिंग करिअर आणि ट्रम्प बद्दल मोकळेपणाने सांगितले.

कनाडाला ५१ वे राज्य’ बनवण्यावर प्रतिक्रिया -

कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांताला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनविण्याच्या ट्रम्प यांच्या इच्छेविषयी त्यांना विचारण्यात आले. अँडरसन स्वतः कॅनडाची असून ब्रिटिश कोलंबियात राहत असल्याने तिने या सूचनेत फारसा रस दाखवला नाही. त्यावर अँडरसन म्हणाली की, ट्रम्प यांच्या सूचनेत मला स्वारस्य नाही.

ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचे रहस्य केले उघड -

अँडरसनला विचारण्यात आले की, ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले होते हे खरे आहे का? अँडरसन म्हणाली, "जेव्हा तुम्ही प्लेमेट असता तेव्हा तुम्हाला कुठेही जाण्यासाठी दिवसाला ५०० डॉलर दिले जातात. होय, मला आठवतंय त्या वेळी मला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी कामावर ठेवलं जायचं.

अँडरसनने खुलासा केला की ही पार्टी २००५ मध्ये झाली होती आणि ट्रम्प पार्टीत त्यांच्या पत्नीसोबत होते, परंतु गंमतीने तिने म्हटले की, "ती कोणती पत्नी होती हे मला आठवत नाही." ट्रम्प यांनी 2005 मध्ये मॉडेल मेलानिया ट्रम्प यांच्याशी लग्न केले आणि २००६ मध्ये त्यांचा मुलगा बॅरॉन चा जन्म झाला. ट्रम्प यांच्याविषयी बोलताना अँडरसन म्हणाली 'ते काही खास नव्हते. "

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर