Nepal Plane Crash : भीषण अपघात! टेक ऑफ घेताना १९ प्रवाशांसह विमान कोसळले, १८ ठार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nepal Plane Crash : भीषण अपघात! टेक ऑफ घेताना १९ प्रवाशांसह विमान कोसळले, १८ ठार

Nepal Plane Crash : भीषण अपघात! टेक ऑफ घेताना १९ प्रवाशांसह विमान कोसळले, १८ ठार

Updated Jul 24, 2024 01:23 PM IST

Nepal Tribhuvan airport Plane Crash : नेपाळमध्ये काठमांडूत त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी विमान दुर्घटना घडली आहे. १९ प्रवाशांना पोखरा येथे घेऊन जाणारे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. यात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! नेपाळमध्ये विमान दुर्घटना; टेक ऑफ करतांना १९ प्रवाशांसह विमान कोसळले
मोठी बातमी! नेपाळमध्ये विमान दुर्घटना; टेक ऑफ करतांना १९ प्रवाशांसह विमान कोसळले

Nepal Plane Crash : नेपाळमधील काठमांडू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. या अपघातात किमान १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, पोखरा जाणाऱ्या विमानात एअरक्रूसह १९ जण होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दल अपघातस्थळी पोहोचले आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला असून प्रवाशांच्या जीविताची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आज सकाळी ११ च्या सुमारास हे विमान टेक ऑफ दरम्यान कोसळले. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर ही दुर्घटना घडली. विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. विमानतळावर दूर वरून आगीचे लोळ दिसत होते. काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९ जण होते. या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली हे सध्यातरी समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले.

मिळालेल्या माहितीनुसार नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान, सौर्य एअरलाइन्सचे विमानाने टेकऑफ केले. मात्र, काही वेळातच हे विमान विमानतळावर क्रॅश झाले. या बाबत द काठमांडू पोस्टने वृत्त दिले आहे. पोखरा-जाणाऱ्या विमानात विमानातील कर्मचाऱ्यांसह १९ जण होते, असे TIA चे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले.

सौर्य एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली होती. अपघात स्थळावरून धुराचे लोट निघत होते. विमानाच्या पायलटला रुग्णालयात नेण्यात आले आहे, विमानतळावर तैनात असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने अधिक माहिती न देता पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. विमानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. प्रवाशांच्या प्रकृतीबाबत तपशील कळू शकला नाही. तरी काही प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सौर्य एअरलाइन्सचे विमान हिमालयीन प्रजासत्ताकातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र असलेल्या पोखरा येथे जात होते. सौर्य एअरलाइन्सच्या वेबसाइटनुसार, बॉम्बार्डियर सीआरजे २०० जेट विमानाचे कंपनी उड्डाण करते. नेपाळच्या हवाई उद्योगात अलीकडच्या काळात भरभराट झाली आहे. यात माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक व परदेशी ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांना सेवा दिली जाते. परंतु अपुरे प्रशिक्षण व देखभालीमुळे दुर्घटना वाढल्या आहेत. युरोपियन युनियनने सुरक्षेच्या कारणास्तव सर्व नेपाळी विमानांना त्यांच्या हवाई हद्दीतून बंदी घातली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर