मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  plane crash in Afghanistan : अफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना, अनेक प्रवाशी ठार झाल्याची भीती

plane crash in Afghanistan : अफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना, अनेक प्रवाशी ठार झाल्याची भीती

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 21, 2024 01:33 PM IST

plane crash in Afghanistan : अफगाणिस्तानातून एक भीषण विमान दुर्घटना झाली आहे. एक प्रवासी विमान क्रॅश होऊन अनेक प्रवाशी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

plane crash in Afghanistan
plane crash in Afghanistan

plane crash in Afghanistan fear of death of many passengers : अफगाणिस्तानमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. बदखशान प्रांतात एक प्रवासी विमान कोसळले असून यात अनेक प्रवाशी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाण मीडियाच्या वृत्तानुसार, विमान एका डोंगराळ भागात क्रॅश झाले आहे. जेबक जिल्ह्याच्या डोंगराळ भागात हे विमान कोसळले आहे. हे विमान नेमके कोणत्या देशाचे आहे या बाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारकडून या बाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, हे विमान भारतीय असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Delhi AIIMS : एम्सचा यू-टर्न! २२जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मागे

अफगाणिस्तानमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. बदखशान प्रांतात एक प्रवासी विमान कोसळले असून यात अनेक प्रवाशी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान भारतीय असल्याचे बोलले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार हे विमान येथील किरण आणि मिंजान जिल्ह्यांतीन उंच डोंगराळ भागात आणि बदख्शानमधील झेबाक जिल्ह्यामध्ये कोसळले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

Ram Mandir : अंतराळातून इस्रोने टिपले राम मंदिराचे आकर्षक फोटो! देशी उपग्रहाची कमाल

अफगाणिस्तानच्या बदख्शान भागात प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. खामा प्रेसच्या म्हणण्यानुसार, विमान त्याच्या मूळ मार्गापासून भरकटले. आणि शनिवारी, २० जानेवारी रोजी रात्री अफगाणिस्तानातील बदखशानमधील झेबाक जिल्ह्याच्या पर्वतीय भूभागावर कोसळले. स्थानिक सुरक्षा अधिकार्‍यांनी हे विमान कोणत्या देशाचे आहे तसेच किती प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, या बाबत माहिती दिली नाही.

अनेक अफगाण माध्यमांनी वेगवेगळे वृत्त प्रसिद्ध केले आहे. काहींच्या मते हे विमान, चार्टर्ड विमान असल्याचे म्हटले आहे. हे विमान मॉस्कोला जात असताना ते क्रॅश झाले, तर काहींनी दावा केला की हे विमान प्रवासी होते.

WhatsApp channel