मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात झाला आहे. एक विमान क्रॅश झाला आहे. सांगितले जात आहे की, गुना विमानतळावर विमान कोसळले. विमानाने नीमच शहराहून सागरकडे उड्डाण केले होते. त्यानंतर महिला पालयटने गुना विमानतळावर इमरजन्सी लँडिंगची परवानगी मागितली होती. लँडिंगच्या वेळी विमानाचे संतुलन बिघडले व त्यानंतर विमान कोसळले.
या अपघातात महिला ट्रेनी पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लँडिंगच्या वेळी हे विमान रनवेवरून पुढे गोपालपुराकडे निघून गेले. अपघातानंतर घटनास्थळी फायर ब्रिगेडआणि रुग्णवाहिका रवाना करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे नीमचहून उड्डाण होताच पायलटने गुना विमानतळावर विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती. विमान उतरत असताना असंतुलित झाले व विमान तलावाच्या काठावरील झुडपात कोसळले. जखमी महिला पायलटला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त विमान दिसत आहे. विमानाचा सांगाडा जमिनीवर पडलेला दिसत आहे. विमान अपघाताच्या कारणाची चौकशी केली जात आहे.