तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Updated May 20, 2024 05:25 PM IST

Chhattisgarh Accident : छत्तीसगड राज्यातील कबीरधाम येथे पिक व्हॅन पलटी होऊन १८ तेंदू पत्ता गोळा करणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाला.

पिकअप वाहन दरीत कोसळले
पिकअप वाहन दरीत कोसळले

छत्तीसगड राज्यातील (Chhattisgarh Accident) कबीरधाम जिल्ह्यात पंडरिया येथे सोमवारी दुपारी पिकअप वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या पिक अप वाहनातून ३० हून अधिक लोक प्रवास करत होते. हे सर्व लोक तेंदूची पाने तोडण्यासाठी गेले होते. परतताना हा अपघात झाला.

सांगितले जात आहे की, कबीरधाम जिल्ह्यातील पंडरिया ब्लाक कुकदूर ठाणे क्षेत्रातील ग्राम बाहपीजवळ हा अपघात झाला. हे सर्व कामगार सेमहारा गावात राहणारे लोक तेंदूची पाने तोडण्यासाठी गेली होती. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला ती पंतप्रधान सडक योजनेत येते. हा मार्ग कुई हून नेऊर आणि रुक्मीदादरला जोडतो. या रस्त्यापासून मध्य प्रदेशची सीमा सुरू होते. सांगितले जात आहे की, हा संपूर्ण परिसर जंगल व डोंगराळ भाग आहे. 

या घटनेबाबत माहिती देताना कबीरधाम एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, कुकदूर क्षेत्रातील ग्राम बाहपानीजवळ ३० लोकांना घेऊन जाणारी पिकअप दरीत कोसळली. त्यांनी सांगितले की, हे सर्व लोक तेंदू पाने तोडण्यासाठी गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

मुख्यमंत्री साय‌ यांनी या अपघाताबाबत आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर माहिती देताना सांगितले की, कबीरधाम जिल्ह्यातील कुकदूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बाहपानी गावाजवळ पिकअप उलटून दरीत कोसळल्याने १८ ग्रामस्थांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचाराचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 

उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी कवर्धा अपघातावर दु:ख व्यक्त करताना आपल्या सोशल मीडिया हँडल एक्सवर लिहिले की, कवर्धा येथे पिकअप वाहन उलटून झालेल्या दुर्घटनेत १८ लोकांच्या मृत्यूची बातमी खूपच वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. राज्य सरकारच्या देखरेखीत स्थानिक प्रशासन पीडित आणि परिजनांना शक्य ती मदत करेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर