गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी डॉक्टरने पत्नीसह दोन चिमुकलींना संपवलं अन् अपघाताचा केला बनाव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी डॉक्टरने पत्नीसह दोन चिमुकलींना संपवलं अन् अपघाताचा केला बनाव

गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी डॉक्टरने पत्नीसह दोन चिमुकलींना संपवलं अन् अपघाताचा केला बनाव

Updated Jul 17, 2024 07:05 PM IST

एका डॉक्टराने गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी आपले कुटूंब संपवले. त्याने आपली पत्नी आणि दोन चिमुल्या मुलींना संपवले. डॉक्टरने कार अपघाताचा बनाव केला व ४५ दिवस गर्लफ्रेंडसोबत मज्जा मारत राहिला.

डॉक्टरने पत्नीसह दोन चिमुकलींना संपवलं
डॉक्टरने पत्नीसह दोन चिमुकलींना संपवलं

अनैतिक संबंधांचा अंत अनेकदा गुन्हेगारी कृत्यात होत असतो. आंध्रप्रदेशमध्ये अनैतिक संबंधातून एका डॉक्टरने क्रुरतेच्या सर्व सीमा पार केल्या. फिजियोथेरेपिस्ट बी. प्रवीण याने गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी आपले कुटूंब संपवले. त्याने आपली पत्नी आणि दोन चिमुल्या मुलींना संपवले. डॉक्टरने कार अपघाताचा बनाव केला व ४५ दिवस गर्लफ्रेंडसोबत मजा मारत राहिला. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. ३२ वर्षाच्या प्रवीणने आपल्या पत्नीला अनेस्थीसियाची ओवरडोस दिली आणि कार अपघाताचा बनाव केला.

पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने ५ व ३ वर्षाच्या आपल्या मुलींना नाक तोंड दाबून मारले. त्याने हे सर्व यासाठी केले की, कारण त्याला आपली प्रेयसी सोनी फ्रांसिस हिच्यासोबत रहायचे होते. त्याने आपले कुटूंब संपवल्यानंतर दीड महिने काहीच न झाल्यासारखे राहू लागला. याचा कोणालाही सुगावा लागला नाही. पोलिसांनी त्याला अटक करेपर्यंत कोणाला त्याच्यावर संशयही आला नाही. त्याने २८ मे रोजी तिहेरी हत्याकांड केले होते. तीन महिन्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने पत्नीला एनेस्थीसियाचे इंजेक्शन दिले होते. ओव्हर डोस दिल्यानंतर कार दुर्घटना झाल्याचे सांगितले. पोलिसांना हे इंजेक्शन मिळाले होते, त्यामुळे त्याच्यावर संशय वाढला होता.

त्यानंतर केलेल्या चौकशीत डोकं चक्रावणारा प्रकार समोर आला. त्याने कारच्या पुढच्या सीटवर मुलींना बसवून त्यांचे नाक तोंड दाबून ठार मारले. ४५ दिवसानंतर पोलिसांनी त्याला पकडले आहे. खम्मम जिल्ह्यातील रघुनाथपेलम पोलीस ठाण्याचे एसएचओ कोंडल राव यांनी सांगितले की, प्रवीण किरकोळ जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर हैदराबादला गेला व सामान्य जीवन जगू लागला. 

पत्नीच्या शरीरावर आढळले इंजेक्शनचे निशाण -

पोलिसांनी सांगितले की, कुमारी यांच्या शरीरावर सुई टोचल्याचे निशाण आढळले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. कुमारी आणि मुलांच्या शरीरावर अन्य कोणतेही निशाण नव्हते. पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटूंबीयांना सोपवले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कारमध्ये इंजेक्शन सापडले. मात्र ते रिकामे होते. इंजेक्शन तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले गेले. तेव्हापर्यंत प्रवीण हैदराबादमधील एका रुग्णालयात नोकरी करत होता व गर्लफ्रेंडसोबत रहात होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो गर्लफ्रेंड सोनी सोबत एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने रहात होता. ती त्याच रुग्णालयात नर्स होती. एसएचओ राव यांनी सांगितले की, प्रवीणला वाटत होते की, तो या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडेल. याचे कारण होते की, आम्ही ४५ दिवस त्याच्याशी काहीच संपर्क केला नव्हता. अपघात म्हणूनच याची नोंद होती. मात्र इंजेक्शनची फॉरेंसिक तपासणी केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. प्रवीणने आपला गुन्हा कबूल केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर