मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून खुशखबर!

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून खुशखबर!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 15, 2024 09:18 AM IST

Petrol Diesel Price Cut : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात करत सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

Petrol Diesel Price : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच मोदी सरकारने जनतेला मोठी खुशखबर दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची माहिती दिली आहे. यापूर्वी गुरुवारी राजस्थान सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील वॅट दोन टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे एक-दोन दिवसात निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकते. एप्रिल व मे महिन्यात अनेक टप्प्यात लोकसभेचे मतदान होण्याची शक्यता आहे. उद्या (शुक्रवार) सकाळी सहा वाजल्यापासून देशभरात पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू होतील.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियावरून पेट्रोल-डिझेल दर कपातीची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, पेट्रोल- डिझेल दर २ रुपयांनी स्वस्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांच्या हिताचे रक्षण केले आहे. गेल्या काही वर्षात इंधनाच्या दरात वाढ झाल्याने केंद्र सरकारवर टीका होत होती. यावरून यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत पेट्रोल डिझेलच्या दरात थेट २ रुपयांची कपात केली आहे.

 

हरदीप सिंह पुरी यांनी पुढे म्हटले आहे की, संपूर्ण जग कठीण काळातून जात असताना विकसित व विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या किमती ५० ते ७२ टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि आपल्या शेजारच्या देशांमध्ये तर पेट्रोल मिळणेही बंद झाले होते. १९७३ नंतरच्या ५० वर्षातील सर्वात मोठे तेल संकट असतानाही मोदींच्या कुशल नेतृत्वात भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी ४.६५ टक्क्यांनी कमी झाले आहेत

भारत एकमेव देश आहे जेथे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत उलट कमी झाल्या आहेत. मोदी पंतप्रधान बनण्याच्या आधी भारत २७ देशांतून कच्चे तेल खरेदी करत होता. मात्र मोदींच्या नेतृत्वात देशातील जनतेला स्वस्त दरात पेट्रोल, डिझेल व गॅस उपलब्ध करण्यासाठी आता ३९ देशातून कच्चे तेल खरेदी केले जाते.

WhatsApp channel