मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news: डीएनए चाचणी करणाऱ्या कंपनीने माणसाला बनवले कुत्रा, अहवाल येताच उडाला गोंधळ

viral news: डीएनए चाचणी करणाऱ्या कंपनीने माणसाला बनवले कुत्रा, अहवाल येताच उडाला गोंधळ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 20, 2024 05:44 AM IST

US viral news: अमेरिकेत वॉशिंग्टन येथे एका महिलेने तिच्या स्वॅबचा नमूना तपासणीसाठी डीएनए टेस्ट करण्यासाठी पाठवला होता. मात्र, या चाचणी अहवालात हा डीएनए मानवाचा नसून कुत्र्याचा असल्याचा अहवाल दिल्याने खळबळ उडाली आहे.

अमेरिकेत वॉशिंग्टन येथे एका महिलेने तिच्या स्वॅबचा नमूना तपासणीसाठी डीएनए टेस्ट करण्यासाठी पाठवला होता. मात्र, या चाचणी अहवालात हा डीएनए मानवाचा नसून कुत्र्याचा असल्याचा अहवाल दिल्याने खळबळ उडाली आहे.
अमेरिकेत वॉशिंग्टन येथे एका महिलेने तिच्या स्वॅबचा नमूना तपासणीसाठी डीएनए टेस्ट करण्यासाठी पाठवला होता. मात्र, या चाचणी अहवालात हा डीएनए मानवाचा नसून कुत्र्याचा असल्याचा अहवाल दिल्याने खळबळ उडाली आहे.

US DNA Test viral news : पाळीव प्राण्यांची डीएनए चाचणी करणाऱ्या एका कंपनीने एका महिलेला चक्क कुत्रा असल्याचे दाखवले आहे. कंपनीच्या या अहवलामुळे बरीच टीका होत आहे. रिपोर्टनुसार, ही कंपनी टोरंटोमध्ये असून महिलेच्या चाचणी केलेल्या नमुन्यात चक्क कुत्र्याचा डीएनए आढळला आहे. कंपनीने दिलेल्या अहवालात महिलेच्या डीएनएत ४० टक्के अलास्कन मालामुट, ३५ टक्के शार-पेई आणि २५ टक्के लॅब्राडोर जातीच्या कुत्र्याचे नमुने असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल डब्ल्यूबीझेड टीव्ही न्यूजला मिळाला असून हे नमुने क्रिस्टीना हेगर नावाच्या महिलेचे आहेत. हा अहवाल सोशल मिडियावर देखील व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

Viral news : आता घोरणेही गुन्हा! घोरण्याच्या सवयीमुळे दोन शेजाऱ्यात वाद विकोपाला! पोलिसांनी केली दोघांना अटक

या महिलेने तिच्या स्वॅबचे नमुने हे डीएनए चाचणी करणाऱ्या तीन विविध कंपन्यांना पाठवले होते. या पैकी एक डीएनए माय डॉगने कंपनीने क्रिस्टीना ही महिला नसून श्वान असल्याचा अहवाल दिला आहे.

क्रिस्टीनाने तिच्या स्वॅबचे नमुने मेलबर्न, फ्लोरिडा आणि वॉशिंग्टन येथील अन्य तीन डीएनए विश्लेषण करणाऱ्या कंपन्यांना पाठवले होते. यापैकी २ कंपन्या ब्रीड आयडी विश्लेषण करण्यासाठी आवश्यक माहिती देण्यास असमर्थ ठरल्या. पुरेसे डीएनए नमुने नसल्यामुळे विश्वासार्ह अहवाल देऊ शकत नसल्याचे या दोन कंपन्यांनी म्हटले आहे. मात्र, नमुने पाठवण्यात आलेल्या तिसऱ्या एका कंपनीने क्रिस्टीना ही स्त्री नसून ती श्वान असल्याचा अहवाल दिला.

Pimri-Chinchwad Crime : आधी पोटच्या मुलीचा दोरीने आवळला गळा; नंतर स्वत: केली आत्महत्या, धक्कादायक घटनेने थेरगाव हादरले

या अहवलामुळे क्रिस्टीना ही हादरली आहे. ब्रॉड इन्स्टिट्यूट आणि यूमास चॅन मेडिकल स्कूलमधील अनुवंशशास्त्रज्ञ एलिनॉर कार्लसन या बद्दल म्हणाले, 'मला वैयक्तिकरित्या काळजी वाटते की अशा प्रकारचे अहवाल देऊन कंपनी ग्राहकांच्या भावनांशी खेळ खेळतात. तुम्ही विश्वास ठेऊन तुमचे नमुने या कंपन्यांना देत असतात. मात्र, चुकीचा अहवाल दिल्यावर मात्र, रुग्णांना मात्र, मानसिक त्रास सहन करावा लागतो.

चुकीचा अहवाल दिल्याची तक्रार

यापूर्वी न्यू हॅम्पशायर शहरातील एका व्यक्तीसोबत देखील असाच प्रकार घडला होता. या व्यक्तीने माहिती देतांना सांगितले की, 'माझ्याकडे पाळीव प्राणी आहे. मी स्वॅबचा नमुना डीएनए माय डॉगला पाठवला. त्याच्या अहवालात ४० टक्के बॉर्डर कोली, ३२ टक्के केन कॉर्सो आणि २८ टक्के बुलडॉगचे डीएनए असल्याचा अहवाल देत हा व्यक्ति श्वान असल्याचा अहवाल दिल होता. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने तक्रार दिल्यावर डब्ल्यूबीझेड न्यूजच्या क्रिस्टीना हॅगरने तपास सुरू केला. यासाठी तिने कुत्र्याऐवजी स्वत:चा नमुना कंपनीकडे पाठवला. अशाप्रकारे कंपनीने दिलेल्या अहवालावरून गदारोळ झाला आहे. कंपनीच्या विश्वासहर्तावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. सोशल मीडियावर बरेच लोक याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. ते म्हणत आहेत की अशा कंपन्यांवर विश्वास कसा ठेवता येईल ? यावर सरकारने कारवाई करावी. ही सर्वसामान्यांची फसवणूक आहे.

WhatsApp channel

विभाग