मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक..! ट्रेन अपघातात मृत व्यक्तीचा तुटलेला पाय घेऊन गेला माथेफिरू अन् चक्क खाऊ लागला

धक्कादायक..! ट्रेन अपघातात मृत व्यक्तीचा तुटलेला पाय घेऊन गेला माथेफिरू अन् चक्क खाऊ लागला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 23, 2024 06:23 PM IST

एक व्यक्ती तुटलेला मानवी पाय घेऊन फिरत होता. अनेक लोकांनी त्या व्यक्तीला तुटलेला मानवी पाय खाताना पाहिले आहे.

मृत व्यक्तीचा तुटलेला पाय घेऊन गेला माथेफिरू अन् चक्क खाऊ लागला
मृत व्यक्तीचा तुटलेला पाय घेऊन गेला माथेफिरू अन् चक्क खाऊ लागला

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेथे खळबळ माजली आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ती तुटलेला मानवी पाय घेऊन फिरत होता. अनेक लोकांनी त्या व्यक्तीला तुटलेला मानवी पाय खाताना पाहिले आहे. पोलिसांनी कॅलिफोर्नियामध्ये शुक्रवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली जेव्हा तो ट्रेन अपघातात ठार झालेल्या एका व्यक्तीचा तुटलेला पाय घेऊन फिरत होते. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती तुटलेला पाय घेऊन फिरत होता. त्याचा काही भाग तो वास घेत होता तर खातही होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वास्कोमधील स्थानिक एमट्रॅक स्टेशनजवळ झाली. हे स्टेशन बेकर्सफील्डपासून जवळपास २५ मैल उत्तर-पश्चिममध्ये आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसते की, एक व्यक्ती फुटपाथचे निरीक्षण करत आहे. व्हिडिओत दिसते की, तो अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे पाय खात आहे.

आसपासचे लोक याचा व्हिडिओ बनवत असताना तो बिनधास्त दिसत आहे. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. केर्न काउंटी शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे नाव २७ वर्षीय रेसेंडो टेललेज असे आहे. त्याला पुराव्याशी छेडछाड करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याआधी सकाळच्या सुमारास स्टेशनवर एका प्रवाशाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला होता. ट्रेन अंगावरून गेल्याने त्याचे पाय तुटून शरीरापासून वेगळे झाले होते. या घटनेची चौकशी केली जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग