Egg sold for ₹21000 in UK: अंडी हा प्रथिनांचा स्रोत मानला जातो. विशेषतः हिवाळ्यात अंड्याचा नियमित आहारात समावेश केला जातो. त्यामुळे अंड्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळते. पण सध्या बाजारात एका अनोख्या अंड्याची चर्चा आहे, जे तब्बल २१ हजारांत विकले गेले. ब्रिटेनमध्ये या अंड्याचा लिलाव झाला, ज्याला खरेदी करण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. परंतु, या अंड्यामध्ये असे काय खास आहे, ज्यामुळे त्याला इतर अंड्यापेक्षा वेगळे म्हटले जात आहे, याबाबत जाणून घेऊयात.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये एक गोलाकार अंडी २०० पौंड म्हणजेच २१ हजारांना विकले गेले. स्कॉटलंडमधील एका अज्ञात महिलेला समुद्रकिनारी असलेल्या आयर शहरातील सुपरमार्केटमध्ये ही दुर्मिळ अंडी आढळून आली. त्यानंतर या महिलेने हे अंडे एड पॉनल यांना विकले. यानंतर पॉनल यांनी १५० पौंडमध्ये विकत घेतलेले हे अंडे युव्हेंटास फाऊंडेशन या युवा मार्गदर्शक धर्मादाय संस्थेला दान केले. सुरुवातीला फाऊंडेशनला ही देणगी विनोदी वाटली. परंतु, चॅरिटी लिलावात या अंड्यावर लागलेली बोली पाहून ते आश्चर्यचकीत झाले. अंडी विकत घेतलेल्या पॉनल विचारण्यात आले की, त्याला त्याच्या खरेदीबद्दल पश्चात्ताप आहे का? तेव्हा त्याने कोणतीही खंत व्यक्त केली नाही. याआधी २०२३ साली ऑस्ट्रेलियात गोल अंडी ७८ हजार रुपयांना विकली गेली होती.
फाऊंडेशनचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक रोझ रॅप म्हणाले की, लिलिवात दुर्मिळ गोलाकार अंड्यासह ५००० पौंड म्हणजेच ५ लाख ३९ हजार ३६९ रुपये किमतीच्या इतर वस्तू होत्या. या लिलावातून मिळालेल्या पैशातून आम्ही १३-२५ वयोगटातील मानसिक आरोग्याशी झुंजत असलेल्यांना आणि गरजूंना मदत करू.' याआधी असे गोलाकार आकाराचे दुर्मिळ अंडी थॉमसन रॉडिक कॅलन लिलाव गृहात विकले गेले होते, हे अंडी अब्जपैकी एक असते, असे सांगण्यात आले. हे गोल अंडे फारसे पौष्टिक नसते. हे फक्त त्याच्या आकारामुळे खास आहे, असेही म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या