मुस्लिम तरुणीची लग्न पत्रिका पाहून लोक झाले आश्चर्यचकीत! फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मुस्लिम तरुणीची लग्न पत्रिका पाहून लोक झाले आश्चर्यचकीत! फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुस्लिम तरुणीची लग्न पत्रिका पाहून लोक झाले आश्चर्यचकीत! फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Nov 07, 2024 12:47 AM IST

यूपीच्या अमेठीमध्ये एका मुस्लीम कुटुंबातील मुलीच्या लग्नाचं कार्ड सध्या खूप चर्चेत आहे. कार्ड प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे त्यावर छापलेला फोटो. ज्यांनी हा फोटो पाहिला त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

यूपीच्या अमेठीमध्ये एका मुस्लीम कुटुंबातील मुलीच्या लग्नाचं कार्ड सध्या खूप चर्चेत आहे. कार्ड व्हायरल  होण्याचं कारण म्हणजे त्यावर छापलेला फोटो.  ज्यांनी हा फोटो पाहिला त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले. वास्तविक, एका मुस्लीम समाजातील कुटुंबाने हिंदू रीतीरिवाजानुसार आपल्या मुलीच्या लग्नासाठी कार्ड छापले आहे. कार्डच्या वरच्या बाजूला गणपती व श्रीकृष्ण दाखवले आहेत.  इंटरनेट मीडियावर व्हायरल होणारी निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नपत्रिकेत वधू-वर आणि नातेवाईकांची नावे मुस्लीम आहेत. पण लग्नाच्या कार्डवर संपूर्ण हिंदू देवतांचा फोटो दिसत आहे. लग्नाची तारीख ८ नोव्हेंबर असून पत्ता राजा फत्तेपूरच्या अलादीन गावाचा आहे.

या व्हायरल वेडिंग कार्डची चौकशी करण्यासाठी कार्डवरील छापलेल्या नावाच्या मुलीचे वडील शब्बीर ऊर्फ टायगर मुलगा रमजान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून व्हायरल होत असलेल्या लग्नपत्रिकेची माहिती जाणून घेतली. त्यांनी सांगितले की, माझी मुलगी सायमा बानो हिचे लग्न ८ नोव्हेंबर रोजी गाव सेनपूर पोस्ट सोथी महाराज गंज रायबरेली येथील रहिवासी इरफान पुत्र अब्दुल सत्तार याच्याशी होणार आहे. 

मी माझ्या हिंदू बांधवांना आमंत्रण देण्यासाठी हिंदू रीतीरिवाजानुसार लग्नाचे कार्ड छापले आहे. राजापूर आणि फत्तेपूर गावात अनेक ठिकाणी आम्हाला हिंदू बांधवांना निमंत्रित करावे लागले, म्हणून आम्ही विचार केला की त्यांच्यासाठी हिंदू रीतीरिवाजांनुसार कार्ड का छापू नये, आम्ही कुटुंबातील नातेवाईक आणि मुस्लिमांसाठी उर्दूमध्ये कार्डही छापले आहेत, जे हिंदू बांधव वाचू शकणार नाहीत. आमच्या मुलीच्या लग्नाला हिंदू बांधवांना आमंत्रित करण्यासाठी आम्ही असे कार्ड छापले आहे. हिंदूंच्या स्वागताचा कार्यक्रम एक दिवस अगोदर ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शादी का कार्ड वायरल
शादी का कार्ड वायरल

हिंदू मुस्लिम एकतेचे आदर्श उदाहरण -

मुस्लिम विवाहाच्या हिंदू परंपरेनुसार छापण्यात आलेल्या या कार्डमुळे समाजात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण निर्माण झाले आहे, जे बंधुत्वाचे बंध दृढ करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. घरोघरी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारे हे लग्नकार्ड व्हायरल होत आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर